सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी
देशाबरोबरोच
राज्यातही विशेषत: मुंबई व पुणे शहरात कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाचा
प्रादुर्भाव वाढत चालला आहे.या पार्शवभूमीवर लॉकडाऊन वाढवत संचारबंदी कायम
ठेवण्यात आली आहे.या काळात ग्रामीण भागातील नागरीक नियम पाळताना दिसून येत
आहेत. मात्र मुंबई ,पुणेहून आलेले नागरीक सुट्टीवर आल्याप्रमाणे हौसमौज
करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. त्यांनी स्वत: बरोबरच गावकऱ्यांची काळजी
घेण गरजेचे आहे.त्यांनी नियमांचे पालन करत घरातच राहणे गरजेचे असताना ते
पालन करताना दिसून येत नाहीत.अशा लोकांच्या विरोधात दहिवडी पोलीस स्टेशनने
८२ गुन्हे दाखल केले असून यात बहुतांशजण हे मुंबई ,पुणेचीच लोक
आहेत.त्यामुळे मुंबई, पुणेकरांनो सावधान घरातून बाहेर पडणे , हौसमौज
,पार्ट्या ,भांडणतंटे टाळा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा असा इशाराच
दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि आर. पी.भुजबळ यांनी दिला आहे.
सपोनि भुजबळ म्हणाले , मुंबई ,पुणे , आदी ठिकाणी कामानिमित्त असलेले
बहुतांश माणदेशी नागरीकांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावाला येणे पसंत
केले.कोण गाड्या सुरू असताना आले तर काहीजण लपूनछपून आलेत.सुरक्षेच्या
कारणास्तव मुंबई , पुणेहून आलेल्या अनेक नागरीकांना दहिवडी ,म्हसवड या
ठिकाणी तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.मात्र जे गावात राहिलेत
ते नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत.कोण हौसमौज करण्यासाठी घराबाहेर
पडत आहे. कोण चारचौघांना जमवत चौकाचौकात गप्पा मारत ,शिवारातून पार्ट्याही
करत आहेत.काहीजण वेळ मिळालाय म्हणून जमीन ,घराच्या कारणावरून भांडणे काढत
आहेत.अशा तक्रारी पोलीस स्टेशनला येऊ लागल्या आहेत.यात बहुतेक करून मुंबई ,
पुण्याचीच लोक दिसून येत आहेत.
ही वेळ भांडण तंटे
,हौसमौज ,पार्ट्या करण्याची नसून जीवावर बेतत असलेल्या कोरोना या रोगाला
थांबवण्यासाठी घरात राहणे गरजेचे आहे.गावकऱ्यांना व प्रशासनाला अशा बाहेरून
आलेल्या नागरीकांनी घरात बसून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहनही सपोनि
आर.पी.भुजबळ यांनी केले आहे.
चौकट - ८२ गुन्हे दाखल.....
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ८२ जणावंर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात बहुतांशजण हे मुंबई ,पुण्याचे लोक आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मुंबई,पुणे व आदी ठिकाणाहून लपूनछपून आलेल्या
नागरीकांची माहिती लपवली जात आहे.पोलीस पाटील , ग्रामसेवक ,तलाठी ,आरोग्य
सेवक ,अंगणवाडी सेविकांना ही माहिती मिळणे गरजेचे आहे. तरच आपण व आपले गाव
सुरक्षित राहू शकते.यासाठी गावातील तसेच वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थांनी
अशा व्यक्तींची माहिती लपवू नये.


0 Comments