Hot Posts

6/recent/ticker-posts

गरीब कुटुंबाना दोन ट्रक जीवनाश्यक कीटचे वाटप, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचे दातृत्व

लालासाहेब दडस 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ज्यांची रोजीरोटी थांबली आहे अशा संकटात सापडलेल्या  गरीब लोकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दोन हजाराहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे.देशात राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना दाखल झाल्याने शासनाने कठोर पावले उचलत उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिनाभरापासून लॉक डाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे मात्र सर्वसामान्यांचे आता चांगलेच हाल होत आहेत.
सगळेच बंद असल्याने हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणे अवघड झाले आहे.ही गंभीर होत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी स्वखर्चातून गोंदवले बुद्रुक मध्ये घरोघरी जीवनावश्यक वस्तू पोचविण्याचे ठरवले आहे.गावातील दोन हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना गहू,तांदूळ,लापशी,पोहे,डाळ,कपड्याचा व अंगाचा साबण,बिस्कीट पुडे पोचविल्याच्या कामाला सुरुवात केली आहे.प्रातिनिधिक स्वरूपात गावातील मान्यवर लोकांच्या हस्ते या साहित्याच्या वाहनांचे पूजन करून हे वाटप सुरू करण्यात आले आहे.गावातील इंदिरानगर (बेघरवस्ती) भागातील सर्व कुटुंबाना या वस्तूंचे वाटप करण्यात आले असून दोन दिवसात गावातील सर्व कुटुंबाना घरपोच वस्तू देण्यात आल्या आहेत हे सर्व काम  माझ्या मित्र परीवाराने लिलया पार पाडले याचा मला आनंद आहे असे धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments