Hot Posts

6/recent/ticker-posts

कवठे येथील १९ लोकांना केले कवारंटाईन

कवठे वार्ताहर : दिनांक २४
कवठे ता. वाई येथे पुण्याहून एक पोलीस निकटवर्तीयाच्या अंत्यसंस्कारासाठी गावी आला होता. अंत्यसंस्कारानंतर इतर विधीसाठी तो कवठे येथे काही दिवस वास्तव्यास होता. दिनांक १८ रोजी पुणे येथे तो कामावर हजर होण्यासाठी गेला असता तेथील नियमानुसार त्याची तपासणी करण्यात आली व त्याचा कोरोना अहवाल पाँझीटीव्ह आला होता. मात्र तो कवठे येथे वास्तव्यास असताना त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने व त्याला कोणताही आजार नसल्याने तो विविध कारणास्तव गावातील लोकांच्या सानिध्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन समितीने तातडीने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या संदर्भातील हिस्ट्री तपासली असता त्याच्या कुटुंबातील ७ जणांना व कवठे गावातील इतर ४ मित्र असे एकूण ११ लोकांना दिनांक २३ रोजी व उर्वरित ७ जणांना असे एकूण १९ जणांना किसन वीर महाविद्यालय वाई या केंद्रामध्ये कवारंटाईन केले आहे. पैकी दिनांक २३ रोजी कवारंटाईन केलेल्या ११ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेतले असून ते पुढील अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर दिनांक २४ रोजी उर्वरित ७ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. गेले २ दिवसापासून कवठे गावातील  प्रत्येकाला या सर्वांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा असून यामुळे कवठे गावामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कवठे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी तातडीची नियमावली बनविली असून त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी वागण्यासंदर्भातील सूचना ध्वनीक्षेपक वाहनाद्वारे गावामध्ये दिल्या जात आहेत. गावपातळीवर सर्व व्यवहार बंद केले असून अत्यावश्यक सेवेसाठी सुद्धा कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
चौकट : एकाच घरावर संकटांचे आघात
घरातील एका तरुण मुलाचे निधन होते व या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला भावाचा कोरोना अहवाल पाँझीटीव्ह आल्याने या कुटुंबावर आघात झाला असता आता कुटुंबातील सदस्य कवारंटाईन केल्याने या कुटुंबामध्ये व गावामध्ये सर्वत्र तणावाचे वातावरण असून यातून सहीसलामत सर्वांची सुटका व्हावी यासाठी संपूर्ण ग्रामस्थ ईश्वरचरणी करुणा भाकत असल्याचे चित्र आज कवठे गावपरिसरात दिसत होते .
बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा

Post a Comment

0 Comments