कवठे वार्ताहर : दिनांक १
वाई
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कोरोनोने आपले हातपाय वेगाने पसरायला
सुरुवात केली असून आज पुन्हा नव्याने ओझर्डे व चिंधवली या गावामध्ये
कोरोनाने आपला प्रवेश केला आहे. यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागातील
गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हि गावे अजूनपर्यंत लांबूनच
परिसरातील गावाच्या कोरोनो रोगाची माहिती मिळवत चिंता करीत होती.
प्रत्यक्षात राकीय दृष्ट्या जागृत असलेली चिंधवली व ओझर्डे या
गावांच्यामध्ये कोरोनो सारख्या रोगाने प्रवेश केल्याने येथील
नागरिकांच्यामध्ये घबराट पसरली आहे.
दिनांक
२९ व ३० जून रोजी घेतलेल्या स्वँप नमुन्यांचे अहवाल आज दिनांक १ जुलै रोजी
प्राप्त झाले. त्यामध्ये ओझर्डे येथील ३९ वर्षीय महिला, चिंधवली येथील २८
वर्षीय तरुण व कवठे ता वाई येथील २८ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला यांचा
अहवाल पाँझीटीव्ह आल्याने वरील तिन्ही गावांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
त्यामुळे गेल्या आठ दिवसांच्यापासून कोरोनोचा विस्फोट सुरु आहे. दरदिवशी
तालुक्यांच्या पूर्व भागातील कोरोनो बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वाढत्या कोरोनोला थोपविण्यास आजपर्यंत
आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासन यशस्वी झाले होते परंतु आता चिंधवली,
कवठे व ओझर्डे या गावांच्यामध्ये नव्याने रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली असून
मुंबई, पुणे या ठिकाणावरून काहीजणांचे पूर्व भागातील चिंधवली, कवठे व
ओझर्डे या गावांमध्ये काहीजणांचे आगमन झाल्यामुळे या परिसरात कोरोनोचा
शिरकाव झाला.
काही दिवसापूर्वी वेळे, कवठे व सुरूर
या दोन गावांच्यामध्ये कोरोनाबाधित सापडले होते. दुर्दैवाने पुणे मुंबईतील
काही लोक परस्पर गोपनीयरित्या स्वत:च्या गावाकडील घरी राहत असतात त्यासाठी
सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील गावांगावांमध्ये पुणे मुंबई येथून
येणा-या लोकांचे अधिकृत किंवा अनधिकृत पासेस रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास
कोरोनोसारखा रोग थोपविण्यास नक्कीच यश मिळेल. वाई तालुक्याच्यामध्ये
आरोग्यखाते प्रबळपणे काम करत असताना पोलीस प्रशासन २४ तास रस्त्यावर उतरून
विनाकारण फिरणा-यांच्यावर नेहमीच कारवाई करीत असते .तर महसूल प्रशासन
गावांगावांमध्ये नवीन येणा-या लोकांचे यादी तयार करून पोलीस प्रशासनाला
देवून गुन्हे दाखल करीत आहे तरीदेखील नागरिकांच्यामध्ये कोरोनो रोगाची
गंभीरता आढळून येत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. तरीदेखील मुंबई व
पुणे येथून येणारा लोंढा हा थांबत नसल्यामुळे याच्यावर वाई तालुक्याच्या
प्रशासनाने गंभीरपणाने कोरोनो रोग थोपविण्यासाठी. कडक पावले उचलण्याची गरज
आहे.प्रशासनाने या बाबींच्याकडे गांभीर्याने न पाहिल्यास वाईच्या पूर्व
भागातील गावांच्यामध्ये कोरोनोसारखा अतिभयंकर रोग थैमान घातल्याशिवाय
राहणार नाही असे गावागावातील सुजाण नागरिकांच्यामधून बोलले जात आहे. पूर्व
भागातील गावांगावांमध्ये दिवसेंदिवस होत असलेला कोरोनोचा शिरकाव व त्यातून
निर्माण होत असलेले घबराटीचे वातावरण यामुळे गावे भयभीत होत आहेत हे
थोपविण्यासाठी वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर – चौगुले व वाईचे
तहसीलदार रणजीत भोसले , गट विकास अधिकारी उदय कुसुरकर व वाई व भुईंज पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, स.पो.नि. शाम बुवा, तालुका
वैद्यकीय अधिकारी यादव या सर्वांनी एकत्रित येऊन कडक उपाययोजना करण्याची
गरज भासत आहे.शासनाने निव्वळ लॉकडाऊन शिथिल केल्याने वाई तालुक्याच्यातील
नागरिकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

0 Comments