Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणी कोरोना सेंटर बाहेर ताटकळला संशयीत कोरोना रुग्णाचा मृतदेह

सकाळी मृृृतदेेह नेेताना वैद्यकीय पथक-

मंगळवारची सकाळ उजाडली मायणीकरासाठी खळबळजनक

मायणी :- प्रतिनिधी
 सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु असताना मायणी करांसाठी मंगळवारची सकाळ भीतीदायक व खळबळजनक उजाडली  खटाव तालुक्यातील मुळगाव मोराळे असलेले व सध्या हैदराबाद येथे स्थायिक झालेली कोरोणाबाधित पन्नास वर्षीय व्यक्ती उपचारापूर्वीच मायणी येथील कोरोणा सेंटरच्या समोरील मुख्य रस्त्यावर मृत्यूमुखी पडली . यात कहर म्हणून प्रशासन व वैद्यकीय विभागाने वेळीच पाऊल न उचलल्याने पहाटे ३.३० ते ७.३० या दरम्यान तब्बल चार तास या संशयीत कोरोना रुग्णाचा मृतदेह रस्त्यावर ताटकळत पडला होता .
याबाबत सविस्तर वृत्त असे- मायणी पासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या मोराळे गावची व्यक्ती हैदराबाद येथे सोनाचांदीच्या व्यवसायानिमित्त सहकुटुंब राहत होती. त्यांना आपल्या गावी यावयाचे होते .त्या व्यक्तीचा हैदराबाद येथेच पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. मात्र तशाही अवस्थेत कोणताही प्रवास परवाना न घेता आपली ३९ वर्षीय पत्नी, १८व१९ वर्षीय दोन मुली , १३ वर्षीय मुलगा,विखळे येथील २२ वर्षीय व कानकात्रे येथील १९वर्षीय पुरुषअसे सर्वजण एका खाजगी वाहनाने मायणी इकडे यावयास निघाले. रस्त्यात विखळेव कानकात्रे येथील युवकांना सोडून सदर कुटुंब मायणी येथील मेडीकल कॉलेजच्या कोरोणा केअर सेंटर च्या आवारात स्वतः  कोरंटाईन होण्यासाठी रात्री ३.३०च्यादरम्यान आले. दरम्यान सदर जीप चालकास देखील सदर व्यक्तीची स्थिती पाहता हि व्यक्ती कोरोना  पॉझिटिव्ह असल्याचा संशय आला . मात्र मायणीत आल्यानंतर सदर व्यक्ती पॉझिटिव्ह असून जीपसह कोरोणा केअर सेंटरमध्ये सोडल्यास आपणास कोरंटाईन व्हावे लागेल या भीतीने सदर ड्रायव्हर त्यांना कोरोणा सेंटरच्या कंपाऊंड बाहेर रस्त्यावर सोडले व तो निघून गेला. दरम्यान सदर मृत व्यक्तीच्या पत्नीने वॉचमनला आपण हैदराबाद वरून आलो असून आपणास कोरंटाईण व्हावयाचे आहेअसे सांगितले.वॉचमनने येथील डॉक्टंरशी संपर्क साधून सदर  कुटुंबीय कोरंटाईन होण्यासाठी आल्याचे सांगितले . त्यांनी कोरोणा सेंटर प्रमुख मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माहिती दिली . परंतु पहाटे पासून सकाळ पर्यंत या मृत व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरच  पडल्यची वार्ता मायणी गावात पसरल्याने लोक त्या दिशेने धाव घेऊ लागले . तर स्थानिक रहिवाशी भयहीत झाले होते .
      याव्यक्तीच्या सोबत आलेल्या पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी ,व विखळे येथील एक युवक याना कोरंटाईन करण्यात आले आहे . त्यांचे स्वब घेण्यात आले आहेत . तसेच मृत संशयीत कोरोना रुग्णाचा अहवाल आज स्पष्ट होईल अशी माहिती मायानी प्राथमिक आरोगयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुरुकमाने यांनी दिली .

Post a Comment

0 Comments