Hot Posts

6/recent/ticker-posts

हुतात्मा प्रवीण डेरे कुटुंबियांचा बीएसएफ जवानांकडून सन्मान

कवठे (ता. वाई) येथे हुतात्मा प्रविण डेरे यांच्या कुटुंबियांचा सन्मान करताना बीएसएफचे जवान.

 कवठे वार्ताहर दिनांक 31  :  
१४ मार्च २०११ रोजी आसाम मधील कुकरी कालापानी, येथे रात्रगस्त चालू असताना दहशतवाद्यांनी पुरून ठेवलेल्या भुसुरुंगाच्या साहाय्याने जवानांची गाडी उडवली होती. यामध्ये कवठे (ता. वाई) येथील जवान प्रवीण प्रताप डेरे यांना वीरमरण आले होते. 

त्यावेळी हुतात्मा प्रवीण डेरे हे सत्तावीस वर्षाचे होते. सहा वर्ष त्यांनी देशाची सेवा केली होती.
प्रविण यांनी लष्करात भरती होण्यासाठी खूपच जीवतोड मेहनत घेवून ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. त्यांची घरची परिस्थितीही अतिशय बेताचीच होती. ते दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे अकाली निधन आले. त्यांच्या आईने शेतीमध्ये कष्ट करुन दोन मुली आणि प्रवीण यांना मोठ्या जिद्दीने व कष्टाने सांभाळ केला होता. हुतात्मा 
प्रवीण यांच्या सेवेची पाच वर्ष झालेनंतर विवाह झाला. ३१ डिसेंबर २०१० रोजी प्रवीण यांना कन्यारत्न झाले. आपल्या गोंडस मुलीच्या बारशासाठी सुट्टीवर येण्यासाठी निघाले असतानाच आदल्या दिवशी स्फोटात त्यांना हौतात्म्य आले आणि त्या अडीच महिन्याच्या मुलीचेही छत्र हरपले. ज्या वीर कन्येने आपल्या जन्मनानंतर वडीलांचा चेहराही पाहीलाही नव्हता ती पित्याच्या छत्राला मात्र कायमचीच पोरकी झाली. 
       देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पन्नासपेक्षाहून अधिक स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या व देश स्वतंत्र व्हावा यासाठी या लढयात कशाचीही पर्वा न करीता आपल्या बायकांमुलांसह सामील होणारे कवठे गाव. अगदी 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात कवठेतीलच वीर हुतात्मा पोलीस शिपाई अंबादास पवार हेही कवठ्याचेच सुपुत्र. अशा या शूर वीरांच्या भूमीतील ६९ मराठा बॅचमधील सीमा सुरक्षा दलाचे हुतात्मा जवान प्रवीण डेरे यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुरबानी या गीताला स्मरुन प्रवीण डेरे यांच्या बॅचमधील बीएसएफचे सहाकारी व जवान निलेश सोपान भुजबळ, अनिल गोरक्ष झरेकर यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने हुतात्मा जवान प्रविण प्रताप डेरे यांच्या परिवारासाठी एक लाख रुपयांचा निधी गोळा करून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. देशासाठी सैनिक व त्यांचा परिवार खूप मोठा त्याग करीत असतात. या त्यागाची जाण आणि जाणीव आपल्या प्रत्येकाला असायला हवी तसेच ती प्रत्यक्ष कृतीतून करावी या उदात्त हेतूने भारतीय जवान अनिल झरेकर, निलेश बरडे ( अहमदनगर), विठ्ठल शिंदे, महेश पवार, प्रमोद यादव, समाधान शेलार (सातारा), बालाजी हजारे, नवनाथ पवार यांनी कवठे येथे वीरमाता रंजना, वीरपत्नी आश्विनी, वीरकन्या नूतन यांची भेट घेवून, मित्राच्या त्यागाची जाणीव ठेवली. 
       यावेळी सरपंच श्रीकांत वीर, पत्रकार पुरुषोत्तम डेरे, विशाल डेरे, बबनराव डेरे, अभिषेक यादव, अजित डेरे, श्रीकांत डेरे आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments