Ticker

6/recent/ticker-posts

पुष्कर तलाव ओव्हरफ्लो, लोकवस्तीत पाणी च पाणी

शिंगणापूर पुष्कर तलावाचे लोक वस्ती बाजार पटांगणावर आलेले पाणी
छाया चित्र-दीपकराव तंडेबडवे

ऐतिहासिक बांधकाम असल्याने धोका नाही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू 

शिखर शिंगणापूर: १९९८ च्या पाऊसकाळात हा पुष्कर तलाव कठो काठ भरलेला होता तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा शिंगणापूर पुष्कर तलाव ओहर फुल्ल झालेला आहे पूर्वेच्या बाजूने मोठ्या प्रमाणत विसर्ग होत असल्याने व ऐतिहासिक बांधकाम असल्याने धोका नाही अन्यथा सध्याची परिस्थिती गंभीर व भीतीदायक आहे लोकवस्ती बाजार पटांगणावर  पाणीच पाणी आलेले आहे
    ऐतिहासिक मालोजीराजे यांनी दूरदृष्टीने बांधलेला हा तलाव आहे उत्कृष्ट भक्कम बांधकामाचा नमुना वाखाणण्याजोगा आहे सुमारे ३५ एकर व्याप्ती आणि २५ फूट खोली असलेला हा तलाव आहे यात्रा कालावधीसह १२ महिने शिंगणापूर परिसरा साठीचा पाणी पुरवठ्याचे एकमेव ठिकाण आहे तलाव उभारणी म्हणजे शिंगणापूर परिसरातील पडलेले सर्व पाणी यामध्ये साठवण होत आहे शिवाय लोकवस्तीला कोणताही धोका होणार नाही अशी रचना आहे संपूर्ण रेखीव दगडी तटबंदी अंदाजे १० फुटाची आहे चुन्यातील बांधकाम असल्यानेच ते अध्यप भक्कम आहे तरी ही अलीकडच्या काळात त्याची थोडी थोडी गळती सुरू आहे त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे
      माण तालुका आणि अवर्षणग्रस्त भाग असल्याने साठलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी पूर्वीचा विसर्गमार्ग त्याकाळी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे च पाणी बाजार पटांगण लोक वस्तीत आलेले आहे तरी ही मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने धोका नाही अन्यथा सध्यातरी पुष्कर तलावा मध्ये क्षमतेपेक्षा जादाचा पाणीसाठा झालेला आहे या महाकाय पाणी साठ्याचे दृश्य पहाण्यासाठी अबाल,महिला,वृद्ध परिसरातील नागरिक गर्दी करताहेत सामाजिक कार्यकर्ते व नाईक समाज तरुण मंडळांनी धोकादायक स्थिती ओळखून पुष्कर तलाव काठावरील संत मोरेताई मठातील लोकसंख्या सुरक्षित स्थळी हलविण्यात यश मिळवले आहे सुमारे २ तास नातेपुते रस्ता प्रचंड पाणी विसर्गा मुळे बंद होता महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे


Post a Comment

0 Comments