Ticker

6/recent/ticker-posts

पुरात अडकून पडलेल्या व्यक्तीला महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश


 

भेकवली :- तब्बल अठरा तास नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या व्यक्तीला महाबळेश्वर ट्रेकर्स च्या मदतीने बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले  आहे.

     जिल्ह्यासह राज्यभर गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या पावसामुळे नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. काल दिवसभर अनेक ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अनेक धरणात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून खबरदारी घेत  धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे.दोन तीन दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा देण्यात आला असून नदीपात्रातील आजूबाजूच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
     अशातच दि . १४ रोजी या पुराच्या पाण्यात सायं सहाच्या दरम्यान अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक पंचावन्न वर्षीय   व्यक्ती एका झाडाचा आश्रय घेत उभे राहिले आणि पाणी कमी होण्याची वाट पाहू लागली. परंतु पाणी काहीकेल्या कमी होण्याचे नाव घेत नव्हते त्यामुळे ते या पुरात अडकले. त्यांना संपूर्ण एक रात्र झाडावर बसून काढावी लागली. बचाव कार्यात स्थानिक प्रशासनाला काही केल्या यश न आल्याने , कांबळेश्वर  येथे नीरा नदीला आलेल्या पुरात भिलाई देवी मंदिराशेजारी झाडावर एक व्यक्ती अडकून पडली आहे या घटनेची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्स ला देण्यात आली. बचाव कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम  क्षणाचाही विलंब न लावता   फलटण येथे रवाना झाली. संकट कोणत्याही प्रकारचे का असेना बिकट परिस्थितीचा कायम सामना करण्यास तत्पर असलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स ने पूर परिस्थितीचा आढावा घेत आपली नौका पाण्यात उतरवली . पण पाण्याचा प्रवाहच इतका होता की  बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे घेणे आणि त्या व्यक्ती पर्यंत पोहचणे खूप अवघड व  जिकरीचे होते.पण हे अवघड आव्हान महाबळेश्वर ट्रेकर्स नी अगदी लिलया पेलत ती व्यक्ती अडकून पडली होती त्या ठिकाणी जात गेल्या तब्बल अठरा तास झाडावर चढून बसलेल्या  पीडिताला आधार देत आपल्या नौकेवर घेतले आणि सुरक्षित ठिकाणी आणून त्याची या पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली.
    ही मोहिम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री.सुनिलबाबा भाटिया, महाबळेश्वर ट्रेकर्स चे अध्यक्ष श्री.अनिल केळगणे, श्री.जयवंत बिरामणे, श्री.सनी बावळेकर, श्री.अनिल लांगी,श्री.आमित झाडे , 
श्री.अक्षय माने, श्री.दिपक झाडे, श्री.सूर्यकांत शिंदे, श्री.संदिप जांभळे यांनी विशेष प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments