Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम परिवर्तन संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी


सत्य सह्याद्री ऑनलाईन/ पुसेगाव 

जगभर थैमान घातलेल्या करोना विषाणू सोबत झुंज देण्यासाठी अवघं विश्व एकजूट झाले आहे.काही सहृदयी व्यक्ती, संस्था या लढ्यात स्वता:ला झोकून देत आहेत.असेच सेवाभावनेचे व्रत घेऊन  आद्य समाजसुधारक म.फुले यांची कुलभूमी असलेले कटगुण ता. खटाव येथील ' ग्राम परिवर्तन संस्था 'यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून  दरुज ता.खटाव येथे करोना विषयक जनजागृती, तसेच गरीब व गरजूंना किराणा साहित्य किटचे वाटप आदी मौल्यवान कार्य करण्यात आले.
  संस्थेच्या वतीने  दरुज ता.खटाव येथे  'कोरोना मुक्त गाव' ही संकल्पना राबविण्यासाठी येथील ग्रामस्थांना  विशेष दक्षता घेण्यासाठी' ग्राम परिवर्तन संस्था 'चे मुख्य कार्यकर्ते श्री प्रताप गोरे व कार्यकर्ते  यांनी येथील ग्रामसेवक नाझरीकर , ग्राम पंचायत कार्यकर्ते सचिन पाटोळे, आदींच्यावतींने ग्रामस्थांना करोना विषयक जागृती माहिती पत्रकांचे वाटप केले.तसेच फिरत्या (मोबाईल) गाडी सह कोरोना मुक्ती स्लोगन(घोषवाक्ये) , शेतामध्ये, व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितेचे नियम पाळण्याचा मोलाचा सल्ला देऊन जनजागृती केली.
 याबरोबरच 'सुरक्षित गाव उपक्रमांतर्गत दरुज येथील  गरीब, वृद्ध,  कोरोना यौद्धा, गरजूंना  मदत व प्रेरणा म्हणून नऊ प्रकार असलेले जीवनावशक किट देण्यात आले.हे कीट गरजूंना किमान एक महिना पुरेल अशी खबरदारी घेण्यात आली . ही‌‌ मदत खरोखरच गरजूंना मोलाची व प्रेरणादायी ठरणार आहे ‌. सदर सुरक्षित गाव उपक्रमासाठी 'माय चॉइसेस'  संस्थेचे महाराष्ट्र समनव्यक श्री. राहुल सोनवणे , हैद्राबादच्या सौ. रीना दिदी, दरुज चे ग्रामविकास अधिकारी श्री नाझरीकर , सचिन पाटोळे, ग्राम परिवर्तन संस्था कटगुण चे प्रशिक्षक श्री प्रताप गोरे आदींची साथ व उपस्थितीत होती.  हे समाज कार्य विद्यालयांच्या सेवा सहयोगाने सदर उपक्रम दुष्काळी माण  व खटाव, मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पासून  अविरत सुरू आहे.दरुजसह सुमारे 25 गावात हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे संबंधितांनी सांगितले.'सुरक्षित करोनामुक्त गाव' या उपक्रमास ग्राम अभियान,ग्राम परिवर्तन संस्था, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी  व शासकिय विभाग यांचे मार्फत विशेष सहयोग व सहकार्य मिळत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments