Ticker

6/recent/ticker-posts

छातीत दुखू लागल्याने चालकाचा ताबा सुटून एसटीला अपघात सुदैवाने प्रवासी बचावले

पिंपोडे बुद्रुक,दि.१७: पिंपोडे बुद्रुक येथे एसटी वाहनचालकाच्या छातीत दुखू लागल्याने, गाडीचा ताबा सुटून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला कटडा तोडून दोन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने एसटी तील सर्व प्रवाशी या अपघातातून बचावले आहेत..
       आज दुपारी दीडच्या सुमारास वाई डेपोची एसटी वाठार-वाई फेरी करण्यासाठी वाई या दिशेला जात असतांना पिंपोडे बुद्रुक येथे एस टी स्टेंड नजीक राजेंद्र ज्वेलर्स यांच्या दुकाना जवळ आल्या नंतर एस टी चालक अशोक फरांदे रा.ओझर्डे यांच्या छातीत अचानक वेदना व भुवळ आल्याने काही समजण्याच्या आतच गाडीचा ताबा सुटून,गाडी विरुध्द दिशेला जाऊन रस्त्यावरील प्रथम दुचाकीला धडक देऊन,रस्त्या पासून सुमारे चाळीस फूट लांब असणाऱ्या दुकाना शेजारी असणाऱ्या चारचाकी इनोव्हा गाडीला जोरदार धडक देऊन एस टी थांबली.या ठिकाणी चारचाकी गाडी नसते तर एस टी थेट ज्वेलर्स दुकानात गेली असती,मात्र मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत, तर सर्व प्रवाशी या अपघातातून बचावले आहेत.
   एस टी ट्राय०हर ला प्राथमिक उपचासाठी ग्रामिण रुग्नालय पिंपोडे येथे दाखल केले होते,त्यानंतर सातारा सि०हिल हॉस्पीटल येथे दाखल केले आहे राजेंद्र धर्माधिकारी यांचे इन०हा गाडीचे प्रचंड नुकसान झाले असुन पुढील तपास वाठार पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक श्री पाटील व त्यांचे सहकार्या करीत आहेत

Post a Comment

0 Comments