सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क/ पाटण
हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या एका नवजात बालकाला उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही घटना महिन्यापूर्वी घडूनही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्याने संबंधित बालकाच्या पालकांनी तसेच प्रहार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवार, दि. १८ रोजी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी प्रहार संघटनेचे कोयना विभाग अध्यक्ष भरत कु-हाडे एक महिन्यापासून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी नाईलाजाने या प्रकरणी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर अर्धनग्न आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, याबाबत हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हे बालक स्तनपान करताना गुदमरून हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत झाल्याचे कळविले आहे.
0 Comments