कवठे, तालुका वाई येथे बुधवार दिनांक 13 जानेवारी रोजी कवठे वाहागाव पाणलोट विकास प्रकल्प अंतर्गत नाबार्ड तर्फे अनुदान व सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे कवठे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कवठे गावाला एक वेगळाच इतिहास आहे. कै.देशभक्त स्वातंत्र्य सैनिक किसन वीर उर्फ आबासाहेब यांच्या प्रेरणेने कवठे येथील होतकरू तरुण व ग्रामस्थांनी भूजल पातळी वाढण्यासाठी खूप मेहनत घेतली. श्रम दानातून त्यांनी गावची एकी दाखवून दिली. त्यांनी अपार कष्ट करून केलेल्या श्रम दानाचा फायदा येथील ग्रामस्थांना झाला. पावसाचे पाणी जमिनीत मुरले गेल्याने भूजल पातळीत विशेष वाढ झाली. त्यांच्या या कार्याची दखल नाबार्ड ने घेतली. त्यामुळे नाबार्ड तर्फे कवठे गावाला गौरविण्यात येणार आहे.
कवठे, ता. वाई येथे यानिमित्त राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक तथा नाबार्ड चे अध्यक्ष डॉ. जी.आर. चिंतला यांचे हस्ते व नाबार्डचे महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे मुख्य सर व्यवस्थापक श्री. एल.एल. रावळ यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कवठे गावाला नाबार्ड करून विशेष आर्थिक साहाय्य व अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कवठे येथे दुपारी 3 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून नाबार्डचे मार्गदर्शन घ्यावे, अशी विनंती आयोजक व माजी सैनिक सचिन भानुदास पोळ यांनी केली आहे.

0 Comments