Ticker

6/recent/ticker-posts

सातारारोड येथील महिलेला भरदिवसा मुख्य बाजारपेठेत शिवीगाळ, दमदाटी



सातारारोड ,ता.कोरेगाव येथील एका महिलेला दोन इसमांकडून भरदिवसा मुख्य बाजारपेठेत शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली आहे.याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सातारारोड येथे मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गटाराचे काम सुरू आहे. मुख्य बाजारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमण धारकांना रितसर नोटिसा देण्यात आल्या आहेत. अनेक गाळेधारक व दुकानदार यांनी आपापले गाळे व दुकाने मागे सरकून घेतली आहेत. याच ठिकाणी तक्रारदार महिलेचा सुध्दा एक गाळा आहे. त्याठिकाणी सदर तक्रारदार महिला गेली असता माधव भरत शहाणे व वनराज विजय फाळके यांनी संगनमताने तक्रारदार महिलेस दुकानाच्या गाळ्याची जागा आमची आहे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली.
याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक साळुंखे करीत आहेत.
पाडळीस्टेशन - सातारारोड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक असून यासाठी दि .१५ रोजी मतदान होणार आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments