सातारा दि : सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतीसाठी २०३८ मतदान केंद्रावर मतदान होत आहे.परंतु, शिंदी खुर्द ग्रामपंचायती मध्ये सात पैकी एका जागेवर निवडणूक होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त परस्परविरोधी दोन उमेदवारांचेच मतदान झाल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यात २२३ ग्रामपंचायती मध्ये स्थानिक पातळीवर विचारविनिमय करून निवडणूक बिनविरोध निवड करण्यात यश प्राप्त झाले आहे.राजकीय पक्षांच्या तिसऱ्या व चौथ्या फळीतील कार्यकर्त्यानी भाऊबंदकी, गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून गाव एकसंघ आहे. हे दाखवून दिले. पण, जिथे भाऊ भावाचे ऐकत नाही. त्याठिकाणी निवडणूक अटळ आहे. त्यामुळे ६५२ ग्रामपंचायत हद्दीत निवडणुकीची रणधुमाळी व आज मतदान होत आहे. माण तालुक्यातील शिंदी खुर्द या गावात सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सहा जागी बिनविरोध निवड झाली. पण, एका जागेवर समझोता झाला नाही. अखेर निवडणूक लागली. मतदान केंद्रावर अधिकारी,कर्मचारी, पोलीस यंत्रणा सज्ज झाली पण त्या वार्डातील परस्परविरोधी दोनच उमेदवारांनी मतदान केले. दुपारी तीन वाजेपर्यंत कोणीच मतदानाला आले नाही. याची ऐतिहासिक नोंद घ्यावी लागली आहे. आपल्या गावात बिनविरोध निवड व्हावी अशी अपेक्षा सर्वांची होती पण, राव करेल ते गाव करू शकत नाही. याची प्रचिती आली आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसिलदार बाई माने व मतदान केंद्र प्रमुख अशा अनेकांनी मतदान करण्याचे आवाहन करूनही माण तालुक्यातील शिंदी खुर्द येथे दुपारी तीन वाजेपर्यंत दोनच मतदारांनी ते म्हणजे उमेदवारांनीच मतदान केल्याचा दावा केल्याने अनेकांना नवल वाटले आहे. एक प्रकारे मतदार आणि उमेदवार यांनी मिळून लोकशाही च्या उत्साहाला आव्हान तर दिले नाही ना ?याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पैसे व दारू वाटप करण्यात आल्याची तक्रार येत असले तरी कारवाई होत नाही. याचा ही अनुभव यापूर्वी सातारा जिल्ह्याने घेतला आहे.सातारा -कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंटनजिक रस्त्यात एका गाडीत निवडणुकीत पैसे सापडले. तर सायगाव ता जावळी येथे रुग्णवाहिका मधून दारू वाहतूक होत असल्याने व रायगाव येथे साडी वाटप करण्यासाठी आणलेल्या साड्या मिळून आल्या पण, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.यानिमित्त या गोष्टी लक्षात आणून दिल्या जात आहेत.
0 Comments