सुमारे ८२ टक्के मतदान ; किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार नाही
सातारा, दि. १५ : सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत मतदान झाले. ९०९३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेनवडी ता माण येथे एका पक्षाच्या तालुकाप्रमुखाने प्रशासनाशी वादावादी केल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला . मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात ८२ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतमोजणी दि.१८ जानेवारी रोजी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली होते. त्यापैकी २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामध्ये सातारा तालुक्यातील ३९, जावली ३७, कोरेगाव ७, वाई १९, महाबळेश्वर २८, खंडाळा ७, फलटण ६, माण १४, खटाव १४, कराड १७, पाटण ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र ६५२ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. या निवडणुकीत ९०९३ उमेदवार आमने सामने उभे होते. गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला होता.
ग्रामपंचायतीसाठी आज सातारा तालुक्यात ८२ ग्रामपंचायतींसाठी २७९, जावली तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींसाठी ७६, कोरेगाव तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींसाठी १५१, वाई तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी १५१, महाबळेश्वर तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींसाठी ३०, खंडाळा तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींसाठी १३८, फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींसाठी २६१, माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी १४७, खटाव तालुक्यात ९० ग्रामपंचायतींसाठी २६५, कराड तालुक्यात ८७ ग्रामपंचायतींसाठी ३४६, पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतीसाठी १९६ मतदान केंद्रांवर आज किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.
संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी १५ हजार ६७३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
बहुतांश ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान ६९ टक्के पेक्षा अधिक मतदान झाल्याचे चित्र दिसून येत होते. पहिल्या दोन तासात १३.११ दुपारी दीड वाजेपर्यंत ५४ .१० टक्के नंतर सायंकाळी साडेपाच पर्यंत निवडणूक विभागानी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ८२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले . निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही . मात्र शिंदी ता माण या ग्रामपंचायतीत तीन वाजेपर्यंत काहीच मतदान झाले नसल्याचे वृत्त होते मात्र जिल्हा प्रशासनाकडून या घटनेला दुजोरा मिळाला नाही .सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्ती गर्भवती महिला यांच्यासाठी व्हील चेअर ठेवण्यात आल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे ८२ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. सर्व ईव्हीएम मशीन सील करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते .
ठोसेघर येथे मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव
मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या ठोसेघर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. आज मतदानावेळी पोलिसांनी मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फोटो काढण्याचा ही पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव होता की काय अशा चर्चांना ऊत आला होता.
जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समितीमधील बहुतांश विभागात आज शुकशुकाट जाणवत होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण, उत्तर शिक्षण, अर्थ, कृषी या विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीवर असल्याने हे विभाग पाऊस पडल्याचे चित्र दिसून येत होते. काही पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक यांनाही निवडणुकीची ड्युटी लागली होती.
कुठे वादावादी ...... कुठे कमी मतदान
शेन वडी ता माण येथील मतदान केंद्रावर येथे राजकीय पक्षाच्या दोन गटात प्रचंड वादावादी झाली . दोन्ही गटाच्या उमेदवारांना झालेल्या मतदाराच्या खेचाखेचीवरून तणाव निर्माण झाला होता . हाच तणाव सोमवारी .निकालाच्या दिवशी होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे .
शिंदी ता माण येथील ग्रामपंचायतीसाठी येथे सात जागेसाठी लागलेल्या निवsणुकीत सहा जागा बिनविरोध झाल्या . त्यामुळे फक्त एका जागेसाठी निवडणूक लागणार होती मात्र एका उमेदवाराने सहा जणांना पाठिंबा दिला त्यामुळे दिवसभरात फक्त १५ मतदान झाले .
सोमवारी दि १८ रोजी मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे . प्रत्येक गावासाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी एक मतमोजणी अधिकारी व तीन सहाय्यक असतील . सरासरी अर्धा तास एक फेरी सुरु राहणार आहे . एका वेळी सरासरी पाच ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील असे निवडणूक शाखेने कळविले आहे .
0 Comments