आयटकचे राज्याध्यक्ष कॉ.दिलीप पवार यांचे उपस्थितीत नूतन पदाधिकारी निवडी संपन्न
सातारा: सर्वधर्मीय हॉकर्स संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सादिक पैलवान यांची निवड करण्यात आली आहे. सातारा येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात विविध नूतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्याची माहिती हॉकर्स संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक सरदार (सागर) भोगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा हॉकर्स संघटनेचा जिल्हा मेळावा नुकताच सातारा येथे पार पडला. हॉटेल ओम एक्सीक्युटिव येथे दि.18 जानेवारी रोजी आयटकचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉ, दिलीप पवारयांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्यात आयटक संलग्न सर्वधर्मीय हॉकर्स संघटनेच्या विविध पदाधिकार्यांची निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप माने, सरचिटणीसपदी कॉ.शामराव चिंचणे, सचिवपदी दिपक शिंदे, सहसचिवपदी महेंद्र जाधव (पिंटूशेठ), खजिनदारपदी विनोद मोरे, सातारा शहराध्यक्षपदी संजय पवार आदी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी आयटक राज्याध्यक्ष व राज्य हॉकर्स फेडरेशनचे ज्येष्ठ नेते कॉ.दिलीप पवार यांच्यासह
कॉ.शिवाजी पवार, कॉ.शामराव चिंचणे, राम हादगे, संजय पवार, रामभाऊ सावंत, प्रशांत धुमाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्षांच्या निवडी येत्या 15 दिवसांत जाहीर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले.
या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शहरांतील हॉकर्सच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी हॉकर्सचा बायोमेट्रिक सर्व्हे, हॉकर्स झोन्स, लायसेन्स, बँक कर्जे इ.प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व नगर पालिका, नगरपंचायतींकडे पाठपुरावा करणे, जिल्हा संघटनेची नोंदणी करणे आदी विषय मार्गी लावण्यासाठी सादीक पैलवान यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायतींमधील हॉकर्सचे पदाधिकारी घेऊन जिल्हा कार्यकारिणी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यास महाबळेश्वर, वाई, पाचवड, जावली, सातारा, कराड, फलटण, दहिवडी येथील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments