जेसीबी मधून विजयी मिरवणूक काढण्यात आली, त्यावेळेस चा क्षण
वेळे वार्ताहर दिनांक २०
गुळूंब तालुका वाई येथील दिनांक १९ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी पॅनल प्रमुखांसह गावात जेसीबीमधून मिरवणूक काढत विरोधकांच्या घरापुढे जाणीवपूर्वक फटाके फोडून सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उलघन करून गावात कायदा सुव्यवस्था बिघडवल्याची तक्रार झाल्याने भुईंज पोलिसांत रात्री उशिरा तक्रार झाली असून गुळुंब ग्रामस्थांनी याबाबतचे लेखी निवेदन वाई तहसीलदार ,जिल्हाधिकारी व गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे गुळुंब येथील ग्रामविकास ऐक्य पॅनेलचे विजयी झालेले उमेदवार अनिकेत अंकुश जाधव, विमल धर्माजी जाधव,कु स्वाती शिवाजी माने सचिन दादासाहेब यादव,रेश्मा दिलीप पवार कल्पना राजेंद्र यादव या विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुख महादेव जगनाथ मस्कर रा, मयुरेश्वर अंकुश रामचंद्र जाधव रवींद्र रामचंद्र जाधव, राजेंद्र महादेव यादव यांच्यासह सर्व पॅनल समर्थकांनी दुपारी 12 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास गुळुंब गावातून जेसीबीमधून विजयी मिरवणूक काढून गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक चालू असताना विरोधी भैरवनाथ ग्रामीण विकास पॅनेलचे प्रमुख गणेश एकनाथ जाधव रा गुळूब यांच्या घरासमोर अंगणात गुलाल टाकून फटाक्यांची आतिषबाजी केली याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात वरील सर्वांच्या विरोधात गणेश जाधव यांनी दाखल केली आहे त्याच बरोबर वरील सर्वांवर जलद गतीने कारवाई व्हावी यासाठी भैरवनाथ पॅनल प्रमुख प्रताप ज्ञानेश्वर यादव,किसन एकनाथ यादव,सागर विश्वास जाधव, गोविंद बबन यादव संतोष धर्माजी यादव,कृष्णा मानसिंग यादव, रवींद्र मारूती जाधव, प्रताप श्रीपती यादव या सर्वांनी वाई तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देवून संबंधित लोकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 Comments