सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याच्या रागातून झोपडी पेटवून दिल्याने या आगीत झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रद येथील गावाच्या हद्दीत दिनांक बुधवारी रात्री 11 वाजता गट क्रमांक 3 मध्ये संशयित आरोपी कुंडलीक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छींद्र मोरे व सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. पिंप्रद ता. फलटण) यांनी आपापसात संगणमत करुन फिर्यादी कल्पना अशोक पवार (वय 45 रा. अलगुडेवाडी ता. फलटण) या महिलेने खरेदी केलेली जमीन गट नं 3 ही वहीवाट नये म्हणून जमिनीमध्ये मध्ये फिर्यादीने टाकलेली झोपड़ी पेटवून दिली या आगीत झोपडीमध्ये झोपलेली महिला महुली उर्फ मौली झबझब पवार हिचा मृत्यू झाला.
दरम्यान, मौलीचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केल्या प्रकरणी फिर्यादी कल्पना अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी घटनास्थळी अप्पर पोलीस निरीक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट दिली.
त्यांनी याबाबात तपासाच्या सूचना दिल्या असून या घटनेचा तपास सुरू आहे.

0 Comments