भेकवली
"महाराष्ट्राच्या बारा ते साडेबारा कोटी जनतेमधील फक्त दहा लाख मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहचू शकतात. महाबळेश्वर तालुक्यातील मुले जी उच्च शिक्षणापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांनी नोकरीच्या मागे न लागता एक उत्तम मधपाळाचे कौशल्य आत्मसात केले तर ते भविष्यात मधाचे चांगल्या प्रकारे उद्योजक बनू शकतात! असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांनी महाबळेश्वर येथे केले.
आज महाबळेश्वर येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ , मध संचनायल या शासकीय इमारतीचे उद्घाटन ना.सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदीती तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, आमदार मकरंदआबा पाटील , सचिव डॉ.नीलिमा केरकट्टा यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने गांधी पुतळ्याचे अनावरण व विविध उपक्रमांचा शुभारंभ ना . सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आपल्या भाषणात ना. आदिती तटकरे म्हणाल्या "शालेय पोषण आहारामध्ये मधाचा समावेश केल्याने येणारी पिढी ही निरोगी व सदृढ राहील, महिला व बालकल्याण विभागामध्ये मधाचे वाटप केले तर लहान मुले व गरोदर माता यांना देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोग होईल !
खासदारांनी आपल्या मिश्किल भाषणामध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नावाचा 'मकरंद ' म्हणून थेट मधासीच उल्लेख करत आमदार आणि खासदार यांच्या मार्फत सरकार दरबारातून महाबळेश्वर मधील मधोउत्पादक संस्थेला यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
"जवळपास एक लाख किलो मध या दुर्गम तालुक्यातून जमा केला जातो.आज पर्यंत स्ट्रॉबेरीसाठी ओळख असलेले महाबळेश्वर यापुढे मधाच्या गोडीसाठी ही ओळखले जावे!असे मत वाई विधानभेचे आमदार मकरंदआबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
खादी ग्रोमोद्योग महामंडळाच्या सचिव डॉ.निलीमा केरकट्टा यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली. यावेळी त्या म्हणाल्या " शासनाने मदत केली तर महाबळेश्वर पर्यटन स्थळांमध्ये आणखीन एका पर्यटन स्थळाची वाढ होऊ शकते!
यावेळी समाजभूषण श्री.बाळासाहेब भिलारे, महाबळेश्वर चे माजी नगराध्यक्ष श्री. डि.एम.बावळेकर, सातारा जिल्हाबँकेचे संचालक श्री.राजेंद्र सेठ राजपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .यशवंत घाडगे, उपसभापती श्री. संजुबाबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments