वेळे प्रतिनिधी दिनांक 24
वाई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या डी. बी. विभागाच्या पथकाने गणेश फरांदे रा. यंग रविवार पेठ वाई हा त्याचे रहाते घराचे शेजारी मोकळ्या जागेत विदेशी दारूचे चोरटी विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती खोबरे यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकाने नियोजित स्थळी तातडीने धाव घेवून सापळा लावून छापा टाकला असता त्याच्या ताब्यात असणारे दारूचे बॉक्स उघडून पहिले असता त्यात दारूच्या देशी विदेशी बाटल्या आढळून आल्या. त्याला याबाबत दारू विक्रीचा अधिकृत परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातील १ लाख ६ हजार १७८ रुपयांच्या देशी विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त करून गणेश फरांदे यास ताब्यात घेवून त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या डी. बी. पथकाने केलेल्या धाडसी कारवाईमुळे वाई शहरातील व तालुक्यातील गावागावांमध्ये विनापरवाना दारूविक्री करणा-या दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी देखील वाई पोलिसांनी मेणवली येथे लाँकडाऊन काळात विनापरवाना लाखो रुपयांची दारू विक्री करताना छापा टाकून खळबळ उडवून दिली होती. अश्या बेधडक कारवाईमुळे वाई शहरातून आणि तालुक्यातील गावांमधून विनापरवाना दारू विक्री नक्कीच बंद होण्यास मदत होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे वाई पोलीस ठाण्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की गणेश फरांदे रा. यंग रविवार पेठ वाई हा त्याचे राहते घराचे शेजारी मोकळ्या जागेत देशी विदेशी चोरटी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळताच त्यांनी आपल्या डी.बी. विभागाचे सहाय्यक फौजदार शिर्के, शिवाजी वायदंडे, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे , महिला पोलीस शीतल साळुंखे यांना तातडीने यंग रविवार पेठ येथे सापळा रचून या दारूच्या विक्री होत असलेल्या जागेवर छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता जवळपास देशी विदेशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले १८ बॉक्स पोलिसांना सापडले . लाँकडाऊन काळात देखील गणेश फरांदे याने धाडस करून सुरु केलेली बेकायदेशीर दारू विक्री याचे आश्चर्य या पथकाला वाटले. त्यांनी ५८२० रुपयांची मँकडॉल व्हिस्कीच्या चार बाटल्या, २५६०० रुपयांच्या ९० मिलीच्या एकूण ३२० व्हिस्कीच्या बाटल्या, ७२०० रुपयांच्या विदेशी मँकडॉल व्हिस्की ३७५ मिलीच्या २४ बाटल्या, ९३०० रुपयांच्या विदेशी ब्लँक डी.एस.पी. ९० मिलीच्या व्हिस्कीच्या एकूण १२४ बाटल्या, २००२० रुपयांच्या विदेशी इम्पेरीयल ब्ल्यू लेबल असलेल्या १८० मिलीच्या १४३ बाटल्या, ६७२० रुपयांच्या इम्पेरीयल ब्ल्यू लेबल असलेल्या ३७५ मिलीच्या २४ बाटल्या, १७१७० रुपयांच्या विदेशी रॉयल स्टँगच्या १८० मिलीच्या एकूण १०१ बाटल्या, १८०० रुपयांच्या विदेशी मँकडॉल व्हिस्कीच्या १ लिटरच्या एकूण ३ बाटल्या , ४७६० रुपयांच्या विदेशी दारूच्या ब्लँक डी.एस.पी. ३७५ मिलीच्या व्हिस्कीच्या एकूण ४ बाटल्या, ८४० रुपयांच्या विदेशी हारवर्ड व्होडका लेबल असलेल्या १८० मिलीच्या ७ बाटल्या, १५९८ रुपयांच्या विदेशी क्लासिक व्होडका लेबल असलेल्या १८० मिलीच्या एकूण १७ बाटल्या, 102 रुपयांच्या ब्रिटीश ड्युट जिन लेबल असलेल्या १८० मिलीच्या एकूण ३ बाटल्या, ६८ रुपयांच्या ब्लू रायबँड लेबल असलेल्या १८० मिलीच्या २ बाटल्या, १८० रुपयांच्या विदेशी क्रीस्टन ब्रदर लेबल असलेल्या १८० मिलीच्या ४ बाटल्या, ६८ रुपयांच्या विदेशी गिलेज एन लेबल असलेल्या १८० मिलीच्या दोन बाटल्या, २०० रुपयांच्या विदेशी रेड रम लेबल असलेल्या १८० मिलीच्या २ बाटल्या, १३४ रुपयांच्या विदेशी ब्लँक पाईपर लेबल असलेल्या १८० मिलीच्या दोन बाटल्या , ४१४ रुपयांच्या विदेशी स्नो बाँल व्होडका लेबल असलेल्या १८० मिलीच्या एकूण ३२ बाटल्या, १११६ रुपयांच्या विदेशी गोल्ड ओल्ड लेबल असलेल्या १८० मिलीच्या १८ बाटल्या,७३६ रुपयांच्या विदेशी करण व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ८ बाटल्या, ५०० रुपयांच्या विदेशी पाईव्ह रायफलच्या १८० मिलीच्या ५ बाटल्या, १४८ रुपयांच्या विदेशी ओल्ड ड्राव्हनच्या १८० मिलीच्या ४ बाटल्या असा एकूण १ लाख ६ हजार १७८ रुपयांच्या देशी विदेशी दारूचे १८ बॉक्स वाई पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने पडकून लाँकडाऊनच्या कालावधीत लाखो रुपयांची दारूची चोरटी विक्री रोखण्याचे धाडस करणा-या या गणेश फरांदेला या पथकाने नक्कीच अद्दल घडवल्याने वाई शहरात खळबळ उडाली आहे. या धाडसी कारवाईचे सर्व थरातून कौतुक होत आहे
0 Comments