सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोवईनाक्यावरील मीन कॉम्प्युटर्स ऍण्ड हार्डवेअर व रविराज स्टील सेटर तसेच पंताच्या गोटातील प्लास्टिक नॉयलॉन दुकान या तीन दुकानांचा समावेश आहे.
यामध्ये साताऱ्यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख (रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी) यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवले होते. याप्रकरणी पोलिस हवालदार चेतन ठेपणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पंतांचा गोट येथील संभाजी महादेव शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही त्यांनी प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले.
याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पालिस कर्मचारी राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोवई नाक्यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू होते. याप्रकरणी अतुल मोहन कुंदक (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात पोलिस हवालदार चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुंदक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments