फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाची काल रात्री मयत झालेली होती. परंतू मयत होवून सुध्दा मयताला अंत्यसंस्कारासाठी न हलवल्याने संतापलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलची तोडफोड केली व तेथील डॉक्टरांना आणि अधिकार्यांना शिवीगाळ केली असल्याचे समोर येत. घटनास्थळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे हे दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहेत. या बाबत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप म्हणाले की, संबंधित प्रकाराची माहिती डॉ. जे. टी. पोळ यांच्या कडून मिळालेली आहे. पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करित आहे. लवकरात लवकर संबंधितांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल.

0 Comments