Ticker

6/recent/ticker-posts

सुहास राजेशिर्केच्या मदतीने गहिवरले चेहरे !

सातारा
कोरोनाचा फास माणसाभोवती दिवसेंदिवस घट्ट होत असल्याने सर्वत्र भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हातावरचे पोट असणारे, मजूर गरीबांच्या आयुष्याची होणारी हेळसांड, उपासमार लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के व त्यांचे चिरंजीव शंभू धावून गेले. कोरोनाची कोणतीच भीती न बाळगता गरजुंच्या दाराघरात जाऊन त्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले. राजेशिर्के कुटुबियांनी दाखवलेल्या या माणसुकीमूळे अनेकांना गहिवरून आले तर अनेकांच्या चेह-यावर समाधान फुलले.

कोरोनामुळे एक वर्षापासून माणसाचे सार्वजनिक जनजीवन लॉकडाऊन झालेय. अनेकांच्या हातातला कामधंदा गेलाय. हाताला काम नाही आणि पोटाला भाकर नाही, अशा अवस्थेत गरीब माणूस जगण्यासाठी धडपत आहेत. ही धडापड आपण सर्वचजण पाहतो. मात्र त्याकडे माणूसकीच्या भावनेतून बघातोच असे नाही. सुहास राजेशिर्के यांनी मात्र माणूसकीच्या भावनेतून त्यांच्याकठे पाहिले. केवळ पाहिलेच नाही तर त्यांच्या घरी जावून त्यांची आपलेपणाने विचारपूस करून त्यांना आर्थिक स्वरूपाची मदतही केली. वडिलांचे हे मदतकार्य पाहून शंभू यांनीही सॕनिटायझर पासून ते साबणार्यंत आणि तांदळापासून ते गहू ज्वारीपर्यंत अनेक जीवनावश्यक वस्तू गरीबांच्या दारत नेऊन पोहच केल्या. रस्त्यावर चपला शिवायला बसलेले, घंटा गाडीवर काम करणारे, शहरातील झाडलोट करणारे सफाई कर्मचारी यांच्याशी संपर्क करून मदतीच्या माध्यमातून त्यांना दिलासा दिला. पोवई नाका, समर्थ मंदीर, जकातवाडी कचरा डेपो, माहुलीची कैलाश स्मशानभूमी येथील लोकांचे अश्रू पुसण्याचेच कार्य सुहास राजेशिर्के यांच्या हातून घडले आहे.

वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमात अन्नदान, फळे वाटप करण्यापासून ते कोरोना पेशंटचा हॉस्पिटलचा खर्च करण्याचे दातृत्व राजेशिर्के यांनी दाखविल्यामुळे राजेशिर्के कुटुंब हे गरजुंचे आधार केंद्र बनले आहे.पोवई नाका, समर्थ मंदीर, जकातवाडी कचरा डेपो, कैलाश स्मशानभूमी येथे जाऊन ते पीडीतांचे अश्रू पुसण्याचे कार्य करत आहेत. सुहास राजेशिर्के यांनी पाणी पुरवठा सभापती व उपनगराध्यक्षपदाची धुर चांगल्या पध्दतीने सांभाळून समाजसेवा केली. मुळातच राजेशिर्के घराण्याला ऐतिहासिक वारसा असल्याने छत्रपती शिवरायांचे समाजसेवेचे व्रत ते मनोभावे जपत आले आहेत. श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांचे ते विश्वासू निकटवर्ती आहेत. त्यामुळे खा. उदयनराजे यांच्यावर निष्ठा असणारे कोणीही त्यांच्याकडे गेले तरी राजेशिर्के त्यांचे यथायोग्य आदरतिथ्य करतात

संकटकाळात लोकाना मदत केली पाहिजे. संकटग्रस्तांचे जगणे सुसह्य करण्यासाठी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदतही केली पाहिजे. कारण कोरोनाने जी परिस्थिती निर्माण केलीय ती कधी निवळेल हे अस्पष्ट आहे. अशावेळी गरिबांना कोण आधार देणार. मी जी मदत केलीय वा करतोय ते काही फार मोठे काम किंवा उपकार करतोय असे अजिबात नाही. माणूस म्हणून माणसाला मदत करणं हा साधा माणूसकीचा सिध्दांत आहे, तो आपण जपला पाहिजे. खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे, अशी भावना सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments