Ticker

6/recent/ticker-posts

बारामती परिसरात कडकडीत बंद

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बारामती: लखीमपूर खेरी ( उत्तर प्रदेश ) येथे शांतपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर, केंद्रीय मंत्र्यांचे मुलाने जाणीवपूर्वक गाडी घालून त्यात शेतकरी चिरडल्याने शहीद झाले......
           या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार दि.11 ऑक्टोबर हा दिवस, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद म्हणून घोषित केला या बंदला बारामती मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते बारामती मधील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला पाठिंबा नोंदविला तसेच बारामती बाजार समिती, गणेश भाजी मंडई येथेही बंद पाळण्यात आला. एकूणच बारामतीकरांनी आज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लखीमपूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. बारामती येथील भिगवण चौकामध्ये महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, चे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली 
यावेळी या तिन्ही पक्षांचे बारामती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  दरम्यान माळेगाव बुद्रुक येथील नगरपंचायत हद्दीतील सर्वच दुकाने, भाजीपाला, कपड दुकाने, सराफ दुकाने, तसेच इतर सर्व पूर्णपणे बंद केली गेली होती फक्त अत्यावश्यक सेवा दवाखाना, मेडिकल इत्यादी चालू होते 
  या बंदचे आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दीपक (बापू) तावरे ऍड. राहुल तावरे शिवसेनेचे विश्वास मांढरे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल वाबळे इत्यादी महा विकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले होते या आव्हानाला माळेगावातील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.
 या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माळेगाव पोलीस चौकी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव येथे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments