Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी पाच वर्षे कारावास

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज:
  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस वडूज  न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शुभम दत्तात्रय सकट (वय 20, रा. वडगाव, ता. खटाव) असे आरोपीचे नाव असून औंध पोलीस ठाण्यात याप्रकरणी एप्रिल 2018 साली गुन्हा दाखल झाली होती.
याबाबत माहिती अशी,  एप्रिल 2018 मध्य  शुभम दत्तात्रय सकट  याने अल्पवयीन पीडीत ही तिच्या घरी एकटी असताना वेळीवेळी तिचे घरी जाऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे लग्न करूया असे सांगून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून अत्याचार केला. त्या कारणाने पीडित मुलगी गर्भवती राहिली. याबाबत औंध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता
 सदर गुन्हयाच्या तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक श्रीमती. एम . एस . जाधव  यांनी केला.
त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले तसेच वैदयकीय पुरावा जमा केला. बारकाईने तपास करुन आरोपीविरुध्द जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोप दाखल केले.   या कामी सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील  . अजित पी. कदम यांनी काम पाहिले . या खटल्यामध्ये 5 साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा , वैदयकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन  जिल्हा व सत्र न्यायाधीशस  पी. वाय. काळे  यांनी आरोपीला दोषी ठरवून  शुभम दत्तात्रय सकट  याला भा.दं.वि.सं. कलम 376 ( 2 ) ( एन ) प्रमाणे 5 वर्षे सक्तमजुरी व दंड र.रु. 2,000 / आणि दंड न भरलेस दोन महिने सश्रम कारावास बा.लैं . अत्या . प्र . कायदा कलम 4 सह 6 प्रमाणे 5 वर्षे सक्तमजुरी व दंड र.रु. 1,000 / - आणि दंड न भरलेस एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा देण्यात आली.
दंडाची रक्कम फिर्यादीला देण्याची तरतूद करणेत आली आहे. याकामी सरकारी वकील यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉड औंधच्या  हवालदार सौ . व्ही. एल. दडस, आणि प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे हवालदार दत्तात्रय जाधव ,  हवालदार  दीपक शेडगे , पो. कॉ . सागर सजगणे , पो. कॉ. अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments