शहरातील
मोक्याच्या ठिकाणी असलेली महाबळेश्वर नगरपालिकेच्या मालकिची करोडो
रुपयांची मिळकत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी
पल्लवी पाटील यांनी दबंग कारवाई करीत पालिकेच्या वतीने ताब्यात घेतली या
दबंग कारवाई मुळे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे शहरात कौतुक व अभिनंदन
होत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी चौकात असलेली
सि.स.नं १६९ हि मिळकत पालिकेच्या मालकिची आहे ११,२३०चौ.मि.असलेल्या या
मिळकतीमध्ये ३५०७ चौ.मि.क्षेत्र सांस्कृतिक भवनासाठी राखिव ठेवण्यात आले
होते.
साधारण सन २००० मध्ये या ठिकाणी सांस्कृतिक भवन
बांधन्याचा निर्णय नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला व त्या नुसार ९०लाख
रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला व काम सुरू झाले परंतु तदनंतर तत्कालीन
नगराध्यक्षांनी सदर आराखड्यात इतर काही बाबींचा समावेश केल्याने त्याचे
बजेट वाढले त्या मुळे प्रकल्पाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू राहीले व
अंदाज पत्रकिय रक्कमे पेक्षा बजेट मध्ये किती तरी पटीने वाढ झाली व सदरचे
काम पूर्ण करणं नगरपालिकेच्या दृष्टीने एक प्रकारचे आव्हान झाले व प्रकल्प
पूर्ण पणे बारगळला.
त्यानंतर सदर प्रकल्प जैसे थे
परिस्थिती मध्ये भाडेकरारावर देण्याचे नगरपालिकेने ठरविले व मुंबई येथील
लॅन्ड मार्क प्रा.लि. कंपनी सोबत भाडेकरार करण्यात आला.सदर वास्तू मधील
मुख्य हाॅल,खोल्या, जलतरण तलाव ई.साठी तिन वर्षा साठी रू ३० लाख भाडे
तत्वावर मिळकत सदर कंपनीचे संचालक आबू सयाम अन्सारी यांच्या ताब्यात
देण्यात आली.प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्याने पुढील काम कंपनीने स्व
खर्चाने पूर्ण करण्याचे ठरले व या प्रमाणे सदर काम पुढील काही महिन्यांत
पूर्ण करणे कंपनीस बंधनकारक होते.
मात्र सदर
प्रकल्पाच्या करारा नुसार लॅन्ड मार्क प्रा.लि.कंपनीने महाबळेश्वर
नगरपालिकेस अनामत रक्कम रु.२५ लाख,भाडे रक्कम ५० लाख ४४हजार,कराची रक्कम
१४लाख ४४ हजार व बॅंक गॅरंटी ७३ लाख रुपये असे एकूण १ कोटी ६३लाख रुपये जमा
केले होते व ७२ लाख ७५हजार रुपये येणे बाकी होते.करारानुसार वेळेत काम
पूर्ण न झाल्याने पालिकेने ठरलेल्या मुदतीनंतर भाडेकरूस भाडे सुरू केले व
भाडे भरण्यासाठी सुचित केले परंतु भाडेकरूने भाडे दिले नाही.नंतरच्या काळात
इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने व देखभाल दुरुस्ती अभावी इमारत मोडकळीस आली व
त्या ठिकाणी नको त्या गोष्टी घडू लागल्या तळीरामांचा अड्डा देखील झाला या
वर्षी पावसाळ्यात तर तेथे रात्री कोणी तरी किंचाळत असल्याच्या अफवा सुध्दा
पसरल्या . अखेर सदर इमारतीचा वाद भाडेकरू विरूद्ध नगरपालिका असा न्यायालयात
गेला व त्यावर समन्वयाने मार्ग काढण्यासाठी नि.न्यायाधिश एम.एस.राणे यांची
लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली लवादा समोर अनेक वेळा सुनावणी देखील झाली
या प्रकरणी मा.न्यायालयाने ताबा/कब्जा घेणे बाबतीत मनाई हुकूम न केल्याने
महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५चे कलम
९२तसेच महाराष्ट्र नगरपालिका (स्थावर मालमत्ता हस्तांतरण)नियम १९८३ अन्वये
वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी व
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी आज संयुक्त पणे सदर सांस्कृतिक भवन व
जागेचा ताबा घेतला.
या वेळी नगराध्यक्षा स्वपनाली
शिंदे,उप नगराध्यक्ष अफजलभाई सुतार, सर्व नगरसेवक, पालिकेच्या कर निरिक्षक
भक्ती जाधव,सुरज किर्दत व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सदर मिळकती संदर्भात दै.सत्य सह्याद्री च्या वतीने तिन महिन्यांपूर्वी आवाज उठवला होता.
.महाबळेश्वर नगरपालिकेच्या मालकिची मोक्याच्या ठिकाणी
असलेली मिळकत गेले विस वर्षां पासून धुळखात पडली होती.त्या मिळकती मधून
नगरपालिकेला कोणत्याही प्रकारे आर्थिक लाभ होत नव्हता तसेच स्थानिक
नागरिकांना सुध्दा या इमारतीचा फायदा होत नसल्याने सदर इमारतीचा व जागेचा
ताबा आज नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला असून भविष्यात इमारत व जागेचा
विकास करुन सदर वास्तू महाबळेश्वर वासियांना उपलब्ध करून देण्यात येईल.
सदरचा ताबा मिळवण्यासाठी मा.जिल्हाधिकारी शेखर सिंह,उप.जिल्हाधिकारी, सुनिल थोरवे, प्रांताधिकारी, राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार, सुषमा चौधरी , नगरपालिका पदाधिकारी तसेच नगरपालिका कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पल्लवी पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपालिका
0 Comments