खटाव
माण अँग्रो चा तृतीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन करताना संचालक
विक्रम घोरपडे,
प्रीती घार्गे,प्रकाश घार्गे, रिनाताई घोरपडे,अमोल
पवार,अण्णासाहेब निकम
व इतर मान्यवर.फोटो - दत्ता कोळी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी
कारखाना परिसरातील खटाव-माण तालुक्यातील गावांमध्ये यावर्षी
समाधानकारक पाऊस झाला असून या भागातील दुष्काळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर
शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. यामुळें उसाची आवक मोठी असणार
आहे.यंदाच्या तृतीय गळीत हंगामासाठी के.एम अँग्रो सुसज्ज असून
गतवर्षीपेक्षा अधिक क्षमतेने कारखाना कार्यान्वित होणार असल्याचा असा
विश्वास खटाव माण-अॅग्रो प्रो.लिमिटेड पडळ कारखान्याचे संचालक विक्रम
घोरपडे यांनी व्यक्त केला.
ते खटाव-माण अॅग्रो प्रो.लिमिटेड पडळ ता. खटाव या
कारखान्याचा २०२१-२२ चा तृतीय गळीत हंगाम बॉयलर अग्नीप्रदीपण समारंभ
शुक्रवारी संपन्न झाला सदर वेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालिका
प्रीती घार्गे,रिनाताई घोरपडे,अमोलअप्पा पवार,अण्णासाहेब निकम ,प्रकाश
घार्गे,हणमंत घोरपडे,प्रज्वल घोरपडे ,भैरवनाथ पिसाळ,प्रदीप पिसाळ आदी
मान्यवर उपस्थित होते.विक्रम घोरपडे पुढे म्हणाले, चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन
मनोजदादा घोरपडे ,संग्राम घोरपडे व संचालक मंडळाच्या यांच्या अथक
प्रयत्नातून खटाव माण साखर कारखान्याची निर्मिती झाली असून चाचणी
हंगामापासून गत दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कारखान्याच्या
मिशनरीमध्ये तांत्रिक बदल करण्यात आल्याने यंदाच्या वर्षी कारखाना अधिक
क्षमतेने गाळप करणार आहे.यंदाही शेतकऱ्यांची बिले,कामगारांचे पगार,ऊसतोडणी
कंत्राटदारांची बिले वेळेवर अदा करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना संचालिका प्रीती घार्गे म्हणाल्या, मोठ्या धाडसाने
पडळच्या माळरानावर कारखाना उभा राहिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून
पावसाचे प्रमाण चांगले आहे .त्याचप्रमाणे तारळी,उरमोडी,टेंभू या
योजनांमार्फत देखील या तालुक्यात पाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर
शेतकरीवर्ग उसाचे उत्पादन घेऊ लागला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या तीन
कारखान्यांप्रमाणे साखरेचा दर्जा असून लवकरच. आगामी काळात डिस्टीलरी
प्रोजेक्ट उभा राहत आहे .याचबरोबर एफ आर पी प्रमाणे बिल अदा करणारा पहिला
कारखाना असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला
आहे.
याप्रसंगी
संचालक अमोल पवार यांची मनोगते व्यक्त केले.याचबरोबर जनरल मॅनेजर अशोक
नलवडे यांनी कारखान्याच्या गत दोन वर्षाचा लेखाजोखा मांडताना कारखान्याच्या
तृतीय हंगामाचा ध्येय व उद्दिष्टाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.यावेळी कारखान्याचे काकासाहेब महाडिक,भाऊसाहेब शिंदे,किरण पवार,अजित
मोरे,तात्यासो पांढरे,नरेंद्र साळुंखे ,प्रदीप पिसाळ,शुभम शेंगडे,विष्णू
जाधव,विनोद घार्गे,दत्तात्रेय घार्गे,बाळासाहेब मोरे आदी मान्यवरांची
उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नलवडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रशासकीय व्यवस्थापक अमोल पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने खटाव माण साखर कारखान्याच्या सभासद ऊस
उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिटन अर्धा किलो प्रमाणे " प्रतिकिलो १५ रुपये
किमतीने साखर" विक्री होणार असून यासाठी कोरोना पार्श्वभूमीवर कारखाना
कार्यस्थळी साखरेसाठी शेतकऱ्यांनी गर्दी न करता.सर्व शेतकऱ्यांना
कारखान्याच्या सर्व विभागीय गट कार्यालयात ही साखर उपलब्ध करून देण्यात
येणार असल्याचे कारखाना संचालक विक्रम घोरपडे व संचालिका प्रीती घार्गे
यांनी जाहीर केले. यामुळे के.एम.अँग्रो संलग्नित ऊस उत्पादित शेतकऱ्यांसाठी
यंदाची दिवाळी गोड होणार आहे
0 Comments