Ticker

6/recent/ticker-posts

माळेगाव कारखान्यावर ऊस वाहतूक दारांचे ट्रॅक्टर ट्रेलर सहित चक्काजाम आंदोलन

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

बारामती: 
ऊस वाहतूक संघटनेच्यावतीने माळेगाव कारखाना कार्यस्थळावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेकडो ट्रॅक्टर टेलर सह ऊस वाहतूकदार उपस्थित होते यामुळे कारखाना कार्यस्थळावर कडे जाणारे सर्व रस्ते जाम झाले होते.
मागील गाळप हंगामातील राहिलेल्या साडेसात टक्के फरक कमिशन सह देऊन ऊस वाहतूकदारांना या वर्षी चालू होणाऱ्या गळीत हंगामाला साखर कारखानदारांनी ऊस वाहतूक दर वाढवून द्यावेत. तसेच कारखाना कार्यस्थळावर कार्यालयासाठी एक खोली द्यावी आगामी गळीत हंगामासाठी टोळ्यांसाठी मिळणारा ॲडव्हान्स ७ लाखांपर्यंत वाढवावा अशा विविध मागण्यांसाठी ऊस वाहतूकदार संघटनेने आंदोलन केले तसेच या दरम्यान कारखाना प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ऊस वाहतूक दार संघटनेच्यावतीने जागरण गोंधळ घातले
यावेळी ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, सागर तावरे, जगदीश देवकाते, सचिन मोठे, संजय खलाटे, हेमंत पवार, सचिन भोसले, संजय खलाटे, वैजनाथ देवकाते, बापू देवकाते, सतीश सतीश आटोळे, कृष्णाजी गावडे, भोसले, कालिदास गावडे, नितीन चोपडे तसेच इतर ऊस वाहतूकदार उपस्थित होते
यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ संचालक सुरेश खलाटे यांनी सांगितले की, संघटनेची साडेसात टक्के फरकाची मागणी मान्य केली असून लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील व इतरही मागण्यांचा विचार केला जाईल यावेळी उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, नितीन सातव, गुलाबराव देवकाते, संजय काटे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments