Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव बाजारपेठ बंद ठेऊन रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध...

पुसेगाव  ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे पावसाचे पाणी
छत्रपती शिवाजी चौकातील दुकानात शिरल्याने आर्थिक नुकसान झाले.

 

पुसेगाव

पुसेगावमधून जाणाऱ्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाच्या आडमुळेपणामुळे निष्काळजीपणामुळे शुक्रवारी झालेल्या पावसाने दुकानात पाणी शिरुन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून याबाबत डोळेझाक करणाऱ्या ठेकेदाराच्या निषेधार्थ पुसेगाव बाजारपेठेतील व्यापारी व ग्रामस्थ मंगळवारी (ता. 5 ) बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, व्यापारी संघटनेचे अंकुशराव पाटील, शिवाजीराव जाधव,सुश्रुत जाधव, ईगल ग्रुपचे सूसेंन जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे दीपक तोडकर, शिवजयंती उत्सव समितीचे सुरज जाधव यांनी सांगितले.
पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या  राज्यमार्गाच्या कॉंक्रेटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे व कंपनीच्या उदासीनतेमुळे शासकीय विद्यानिकेतन ते पुसेगाव पोलीस ठाण्यापर्यंतचे कॉंक्रेटीकरण झाल्यावर हे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. परंतु काम झालेल्या रस्त्यालगतचे नाले व साईड पट्ट्याची कामे झालेली नाहीत. याबाबत हे काम करणाऱ्या ठेकेदाराला वारंवार सांगूनही याबाबत कार्यवाही होत नाही. शुक्रवारी  ( ता. 1 ) झालेल्या पावसामुळे मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील बऱ्याच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुसेगाव पोलीस ठाणे ते सेवागिरी मंदिर दरम्यानच्या रस्त्याचे कॉंक्रेटीकरण अपुर्ण असून सध्या या रस्त्याची वाताहत झाली आहे. या रस्त्यालगतचे जागा मालक कॉंक्रेटीकरण कामास अनुकूल असूनही काम रखडले आहे. या कामात अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोलही हलविण्यात आलेले नाहीत. एकंदरीत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या उदासिनतेमुळे व्यापाऱ्यांना वारंवार मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याने व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेऊन मंगळवारी ( ता. 5 ) ठेकेदाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी दुकाने बंद ठेऊन व्यापारी व ग्रामस्थ संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात जमणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments