सातारा :
चार दिवसांपूर्वीच मदन भोसले यांनी किसनवीर कारखान्यावर सव्वा तीनशे कोटी रुपयांच्या वर कर्ज असेल तर जाहीर करा, असे आव्हान केले होते. परंतु प्रत्यक्षात किसनवीर कारखान्यावर दायित्व कर्ज तब्बल 1 हजार 17 कोटी 34 लाख रुपयांचे आहे. हे मला सरकारी ऑडिटच्या अहवालात आढळून आले. त्यामुळे मदन भोसले हे खोटं रेटून बोलतात. 2003 ला स्व. माजी खा. लक्ष्मण पाटील यांच्या हातून सत्ता त्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी 2003-04 चा ताळेबंद पाहिला तर कारखान्याची परिस्थिती चांगली होती. हे मदन भोसले हे अध्यक्ष असतानाच ताळेबंदात आहे. अनेक वर्षांचा तोटा वाढून कोट्यवधी रुपयांची कर्जे कारखान्यावर झाली. मदन भोसले यांनी काय करावे हे मी सांगू शकत नाही. त्यांनी हिमालयात जावं की राजकीय सन्यास घ्यावा, असा उपरोधीक टोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला. दरम्यान, गतवर्षी कारखाना चालू राहण्यासाठी आघाडी सरकारने थकहमी कर्ज म्हणून 30 कोटी 58 लाख दिले होते. त्यातील केवळ 8 कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे यावर्षी हंगाम सुरु होईल की नाही हे सांगता येत नाही. 14 लाख टन ऊसाचे क्षेत्र या कारखान्याच्या अखत्यारित येत असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, किसनवीर कारखाना हा 2003 ला लक्ष्मण पाटील यांच्या ताब्यातून मदन भोसले यांनी घेतला. त्यावेळी पाटील यांनी कारखाना डबघाईला आणला असा आरोप भोसलेंनी केला होता. मात्र, 2003-04 चा अहवाल पाहिला तर 60 लाख 41 हजार साखर पोती शिल्लक होती. त्यावेळच्या बाजारमुल्याप्रमाणे 91 कोटी व इतर मिळून 99 कोटी 42 लाख भागभांडवल शिल्लक होतं. तर कर्ज 76 कोटी 74 लाख 68 हजार एवढे होते. त्यावेळी कारखाना डबघाईला आला असता तर आर्थिक परिस्थिती चांगली होती. नेटवर्क प्लसमध्ये साडेआठ टक्के होतं. कारखान्याचा विस्तार पाटील यांनी 1996 ला केला होता. 2022 मेट्रीक टन गाळप असलेला कारखाना 4 हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा बनवला. त्याकरता 32 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आज त्याला 22 वर्ष झाली. पाटील यांनी ते कर्ज सगळे निल केले. त्याकाळी कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. केवळ जिल्हा बँकेचे कर्ज होती. आता कित्येक बँकांची कर्ज कारखान्यावर आहेत, असेही पाटील म्हणाले.
यावेळी
0 Comments