Ticker

6/recent/ticker-posts

अवैध गुटखा विक्रीवर पुसेगाव पोलिसांचा छापा.

  

पुसेगाव : अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर दोघांवर
पुसेगाव पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला.

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

पुसेगाव
 पुसेगाव बाजारपेठेत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन पान शॉपवर शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी पुसेगाव पोलिसांनी छापा टाकून ६४ हजार ६२३ रुपयांचा गुटखा जप्त करत कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी पुसेगाव पोलीस ठाणे पथकास अवैध धंद्यावर कारवाई करून समूळ उच्चाटन करणेबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पुसेगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत शिवाजी चौक येथील द्वारका पान शॉप येथे अक्षय सतीश देवकर (रा. पुसेगाव) व रुपेश पान शॉप येथे राजेंद्र शिवाजी जाधव (रा. पुसेगाव) या अवैध गुटख्याची विक्री करताना आढळून आले. या दोघांवर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप शितोळे हे करत आहेत. सदर कारवाईत सहाय्यक फौजदार आनंदराव जगताप,  पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर यादव , शंकर सुतार, पुष्कराज जाधव, सचिन जगताप, शिवाजी माने यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे अवैधपणे गुटखा व सिगारेट विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Post a Comment

0 Comments