Ticker

6/recent/ticker-posts

पळशी येथे सिलिंडरचा स्फोट

नवनाथ भिसे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
 गोंदवले: पळशी ता.माण येथे झालेल्या  घरगुती गॅसच्या स्फोटात मोठया प्रमाणात नुकसान झाले.घरमालक दादासाहेब गुलाबराव जाधव यांच्या घराची स्फोटात झालेल्या हादऱ्याने मोठ्या प्रमाणात पडझड होऊन घरात असणारे सर्व धान्य कागदपत्र आदिंसह अंदाजे रक्कम दीड ते दोन लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी ठीक १० च्या सुमारास घडली.

सदर घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही .यावेळी नायब तहसीलदार अंकुश यवरे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि सदर घटनेची पाहणी करताना त्यांनी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments