फलटण
पिक कर्ज प्रकरण मंजूर करण्यास उशीर झाल्याचा राग मनात धरून सोसायटी सचिव नयन कांबळे यास मारहाण करत ड्रावरमधून १ लाख २० हजार ४०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले बाबत गजनी उर्फ अक्षय बाबुराव पवार यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळलेली माहिती अशी की, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आसू येथील आसू (नंबर एक) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड आसू या संस्थेमध्ये सोमवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास या संस्थेत जाऊन सोसायटीचे काम करत असताना सोसायटी सचिव नयन कांबळे याला सोसायटीच्या कार्यालयात येऊन संशयित आरोपीची आजी श्रीमती सुलाबाई पवार हिचे पिक कर्ज प्रकरण मंजूर करण्यास उशीर झाल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी अक्षय पवार यांने फिर्यादी नयन कांबळे यांच्या कानाखाली चापट मारून ड्रावर मधील ठेवलेले १ लाख २० हजार ४०० रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन गेला असल्याचा तसेच सोसायटीचे नुकसान केले असल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस अंमलदार धराडे करत आहेत.
0 Comments