Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेवक संघटनेचे कामबंद आंदोलन

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

गोंदवले:
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना शाखा माण व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा माण यांचे वतीने एक दिवस काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद येथील महिला सरपंच परिषदेत मा.आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामसवेक युनियन या दोन्ही संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
 
 माण तहसीलदार, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेच्यावतीने औरंगाबाद येथे झालेल्या महिला सरपंच परिषदेत आ. शिरसाठ यांनी ग्रामसवेक संवर्गाबद्दल अपमानास्पद शब्द वापरून अवमान केला आहे.वास्तविक पाहता ग्रामसवेक हा शासन व्यवस्थेत काम करणारा शेवटचा महत्त्वपूर्ण घटक आहे.सदर काम करताना ग्रामसेवक जनमाणसांशी संपर्क व समन्वय ठेवून अत्यंत सचोटीने व पारदर्शक पद्धतीने असंख्य अडीअडचणींवर मात करून केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजना राबवणारा घटक आहे.या बाबी सन्माननिय आमदारांनी लक्षात न घेता बेताल वक्तव्य करून ग्रामसेवकांची प्रतिमा जनमानसात मलीन केली आहे.

या घटनेचा निषेध नोंदवत आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत असं, निवेदनात म्हटल आहे.आ. शिरसाठ यांनी ग्रामसवेक संवर्गाची माफी मागावी व जोपर्यंत या घटनेबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही,तोपर्यंत ग्रामसवेक संघटनांच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील अस,सदर निवेदनात म्हटल आहे.

Post a Comment

0 Comments