महाबळेश्वर: बुधवार दि.29 रोजी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये सकाळ पासूनच रिकामी होती. निमीत्त होते राष्ट्रवादी च्या नेत्याने आयोजित केलेल्या थर्टी फर्स्ट पार्टीचे .
आढावा बैठकीचे निमित्त साधून झोळाची खिंड ते आचली रोड वरील एका फार्म हाऊस वर हि पार्टी आयोजित करण्यात आली होती .या पार्टी मध्ये तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्या सह तालुक्यातील बडे अधिकारी उपस्थित होते .
तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य विभाग व पाणी पुरवठा कार्यालयामधील झाडून सर्व वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी सकाळी 11 ते 5 या वेळेत या फार्म हाऊस वर भोजनासाठी जमले होते. बुधवारी तालुक्यातील बर्याचश्या जमिनीशी संबंधित दावे धारकाना तहसील कार्यालयाकडून तारीख देण्यात आली होती. पण, आज सकाळ पासून तहसीलदार सुषमा चौधरी पाटील नॉट रिचेबल होत्या. सगळे दावे धारक ,फिर्यादी आणि वकील दुपारी 2 वाजे पर्यन्त तहसीलदार यांची वाट पाहत कार्यालया समोर बसून होते. तहसीलदार मॅडम येणार किंवा नाही हे सांगण्या साठी एकही वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित नव्हता .
एसटी चा संप चालू असताना काही नागरिक भाड्यानें वाहने करून कामाकरिता तहसील व पंचायत समिती कार्यालयात आले होते.पण आज त्यांना रिकाम्या खुर्च्यां आणि रिकामी टेबले पाहून हात हलवत परत जावे लागले .
प्रशासन हे जनतेची कामे करण्या साठी असते याचा विसर या अधिकारी वर्गाला पडला आहे .हे अधिकारी राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या इशार्यावर चालतात असा आरोप होत असतो.पण हे आज पुराव्या निशी सिद्ध झाले .
जिल्हाधिकारी साहेब चौकशी करा
अधिकार्यांच्या या गलथान कारभार समोर येण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधित अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0 Comments