बुधवार पेठेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शाळा क्रमांक दहाच्या नजीक संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात एका चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश करीत संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. पुतळा परिसरातील घिसाडी समाजातील कुटुंबियातील हा चार वर्षाचा मुलगा असून दस्तुरखुद्द त्या मुलाच्या पित्यानेच संबंधित डबक्यात साठलेल्या पाण्यात उडी मारून त्या मुलाला बाहेर काढले.
गेल्या काही दिवसापूर्वी शाळा क्रमांक 10 च्या बाजूला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील भागात असणाऱ्या जागेत नगरपालिकेने सुधारणा करण्याच्या हेतूने त्या परिसरातील जुनी भिंत भिंत व अन्य बांधकाम हटवले होते व त्या ठिकाणी सध्या संरक्षक भिंतीसाठीचे काम सुरू होते, मात्र संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी काम करताना कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आले या ठिकाणी जेसीबीने मोठ मोठे खड्डे काढले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सायंकाळी या परिसरात लहान मुले खेळत होती. त्यानंतर एक छोटा मुलगा गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध केली त्या वेळेला काही लोकांनी सांगितले की या परिसरात पाणी साठले डबक्याशेजारी मुले खेळत होती.
1 Comments
so sad news
ReplyDelete