Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या धक्याने म्हसवडला युवकाचा मृत्यू

नळाला मोटार जोडताना दुर्घटना, एकुलता एक मुलगा गमावल्याने परिवारावर शोककळा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड:  
   मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास खासबाग मळ्यात नळाला पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार लावत असताना  महेश शंकर लिंगे  (वय 28) या युवकाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकुलता एक मुलगा गमावल्याने लिंगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या
याबाबत मिळालेली माहिती अशी खासबाग मळा परिसरातील लिंगे वस्तीवर राहणारे शेतमजूर कुटुंब शेती व मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत होते. सहा महिण्या पूर्वीमहेश याचा विवाह म्हसवड येथील दहिवडे मळा येथील सदाशिव दहिवडे यांच्या मुलीबरोबर झाला होता. सर्व काही व्यवस्थीत सुरु असताना काळाने अचानक घाला घातला. सध्या म्हसवड परिसरात आठ दिवसातून एकवेळ पाणी येते म्हणून मिळेल तेवढे पाणी साठवण्यासाठी विद्युत मोटार  मोटार लावून पाणी भरत असताना विजेचा लागून महेश बेशुद्ध पडला. त्याला तातडीने हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तीन हॉस्पीटल मध्ये महेशला त्याचे नातेवाईक घेऊन गेले मात्र. एकही डॉक्टर उठला नाही. एक डॉक्टर उठला तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. तोपर्यंत नियतीने आपला डाव साधला.  
नंतर महेशला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन महेशला मयत घोषित केले म्हसवडचे पोस्टमॉर्टेम रुम मोडकळीस आल्याकारणामुळे म्हसवड येथील पोष्टमार्टम बंद केले आहे.  त्यामुळे म्हसवड पोलिसांना माहिती देवून महेश लिंगे यांचा मृतदेह  रात्री 11.30 वाजता दहिवडी येथे नेण्यात आला. तेथेही  डॉक्टर नसल्याने पहाटे महेश च्या नातेवाईकांनी वडूजच्या व्यक्तीला बोलवून पहाटे तिन वाजता पोष्टमार्टम करुन मृतदेह लिंगे परिवाराच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सकाळी आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पालिकेच्या व आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे महेशचा बळी गेला असल्याचे नागरीक बोलत होते.

पालिकेच्या कारभाराचे चार बळी

म्हसवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या कारभाराचा कळस झाला अगहे. आठ ते नऊ दिवसांतून येणारे पाणी आठ दिवस पुरवायचे त्यासाठी पाणी साठवण्याची धडपड प्रत्येक नळधारक करत असतो. खासबाग मळ्यातही आठ दिवसांनी पाणी आल्याने महेशची पाण्यासाठी सुरु असलेली धडपड मंगळवारी रात्री शेवटची ठरली. महेशच्या  मृत्यूला पालिकेचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची चर्चा शहरात सुरु असून  यापूर्वीही पाणी आल्यावर मोटारीमुळे विजेचा लागून तिघांना आपला प्राण गमवावा लागला आहे. महेश याच अनास्थेचा चौथा बळी ठरला.

Post a Comment

0 Comments