Ticker

6/recent/ticker-posts

सिक्युरिटी गार्डांना मारहाण करून दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला

तडवळे सं.वाघोली हद्दीत घटना*
वार्ताहर;शुभम गुरव, आसनगांव
-------------------------------------------
सिक्युरिटी गार्डांना मारहाण करून १,५५,००० रूपयांचा कंपनीमधील वस्तू व माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक १५/१२/२०२१ रोजी रात्री ११.०० वा.ते दिनांक १६/१२/२०२१ रोजीचे सकाळी ५.०० वा.चे दरम्यान मौजे तडवळे सं वाघोली ता.कोरेगांव गावच्या हद्दीत सातारा ते लोणंद जाणारे रोड जवळ राज्यस्थानी रंगीला ढाब्यासमोर असलेल्या शिवपाईप्स प्रा.लि.कंपनीच्या कंपाऊटच्या भिंतीवरून आठ ते नऊ अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड असलेल्या धर्मराज भाईराज यादव व अमरेश विनोद यादव यांना मारहाण करून तसेच त्यांचे हातपाय रस्सीने व कापडाने बांधून कंपनीमधील इलेक्ट्रीक मोटारी ,पॅनल धातुच्या कॉईली,बारा चार्जिंगच्या बॅटर्या व मोबाईल असा एकून मिळून १,५५,०००/- रूपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी अज्ञात वाहनामधून चोरून नेहला आहे.याप्रकरणी माहिती मिळताच गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सातारा पोलिस अधीक्षक अजय बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे , उपविभागीय पोलिस अधिकारी खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोबले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments