Ticker

6/recent/ticker-posts

यात्रा रद्द झाल्याने उद्रेक, म्हसवडकर रस्त्यावर

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड : 
  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची यात्रा तोंडावर असताना प्रशासनाने रद्दचे आदेश काढल्याने म्हसवडमध्ये या आदेशाने उद्रेक झाला. भाविकांसह सामान्य नागरिकही शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात शनिवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
महसूल विभागाच्या प्रशासनाने सिध्दनाथ जोगेश्‍वरी रथोत्सवाच्या सर्व नियम व अटी आणि कागदपत्रे देऊन  महिनाभर यात्रा परवानगीसाठी म्हसवडकरनी केलेली पळापळ  अखेर व्यर्थ ठरली.
प्रशासनाला गावस्वरुपी रथोत्सवाला परवानगीच द्यायची नव्हती तर 70 लोकांची जबाबदारी घेत असलेली हमीपत्र कशासाठी घेतली? 247 लोकांनी दोन्ही लस घेतली असल्याचे प्रमाणपत्रे कशासाठी घेतली, आधार कार्ड कशाला घेतली?  यात्रा होणार नव्हती मग यात्रा नियोजनाची नौटंकी प्रशासनाने का केली आदी सवाल म्हसवडकरांनी उपस्थित केले आहेे.
ज्या पुण्यात कोरोनामुळे सर्वात जास्त लोक बळी गेले त्या पुण्याच्या जवळ 23 किलो मीटरवर आज आळंदी भरली, आटपाडीत यात्रा भरली एवढी काय पंढरपूरचीवारी ही झाली मग प्रशासनास म्हसवड यात्रेचे का वावडे आहे? तीन महिण्यात म्हसवड मध्ये एकही कोरोना पॅझीटिव्ह  नाही तरी हि म्हसवडच्या यात्रेवर अन्याय का कोविडमध्ये म्हसवडकर ग्रुपने शासनाला व प्रशासनाला केलेल्या  मदतीची हीच का प्रांत साहेब परत फेड असा सवाल संतप्त नागरिकांनी करुन उद्या शनिवारी प्रांताधिकारी यांच्या बदलीची मागणी करत यात्रेला बंदी घेतल्याच्या निषेधार्थ म्हसवड बंदची हाक  देण्यात आली आहे
प्रशासनाला व शासनाला निवडणुकीतील गर्दी चालते, आळंदीतील गर्दी असो वा पंढरपूरची गर्दी असो विजय मिरवणुकीची सभा, रॅली चालते मग म्हसवडची सिद्धनाथ यात्रेचे का प्रशासकीय अधिकारी यांना वावडे आहे गेले दोन महिन्यापासून म्हसवडची पॉझिटिव्ह रेट झिरो असतानाही व मंदिरात रोज दर्शनासाठी आलेले भाविक व मंदिर समिती कोरोनाची मास्क, सॅनिटाइजर दोन व्यक्ती मधील अंतराचे पालन करुन दक्षता घेऊनच भाविकांना मंदिरा श्रीच्या दर्शनासाठी प्रवेश देते त्याच प्रमाणे म्हसवड  पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर  व  त्यांच्या सर्व पदाधिकारी व विरोधी गटाचे सदस्य यांना यात्रा भरवणारा असाल तर निवेदनात बरोबर हमीपत्र देवून यात्रा भरवा असे माण तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी भेट घेऊन हमीपत्र दिले दोन दिवसात निर्णय देतो म्हणणारे जिल्हाधिकारी आज आठ दिवस झाले तरी यात्रा भरवण्याचा निर्णय  न  दिल्याने
पालिका प्रशासन, म्हसवड  पोलिस, मंदिर, ट्रस्ट, मानकरी, विविध प्रकारचे व्यावसायिक, व्यापारी, बांधकाम विभाग, आदी  विभाग प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे गोंधळात सापडलेली म्हसवडची सिद्धनाथ यात्रा कोविडचे कारण करुन जिल्हा प्रशासन हमी पत्र घेऊनही का आडथळा आणत आहेत.  माण खटावला वेगळा कोविडचा न्याय आहे का आणि  जिल्ह्यात इतर ठिकाणी कोविड नाही का तेेेेथे यात्रा भरतात तेथे  नियम का नाही? म्हसवड रथोत्सव यात्रेला वेगळा नियम का असे अनेक प्रश्‍न  उपस्थित होत आहेत.

Post a Comment

0 Comments