Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडी पोलिसांना पडलाय कायद्याचा विसर

संजय भोसले यांचा घणाघात

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बिदाल: दहिवडी पोलिसांच्या वर्तूणीकीवर अनेकदा तक्रीरी झालेल्या असतानाच आता दहिवडी पोलिस अधिकारी याबाबतची सीमाच पार  करतील की काय असा संशय शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

 शिंगणापूर येथील बलात्कार प्रकरणातील पिडीतेची तक्रार याचे जीते-जागते उहाहरण आहे, एवढेच काय  चारा छावणीतील दप्तर जप्त प्रकर या आणी अशा अनेक प्रकरणांनी दहिवडी पोलीसांची जनमानसातील प्रतिमा पूर्णपणे डागाळलेली आहे. यामध्ये सामान्य माणसांना त्रास देणार्‍या अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांची पाठराखन करताना मात्र वरीष्ठ पोलीस अधिकारी कधीही कंटाळत नाही यामुळेच दहिवडी पोलीसांचे असे प्रकार वाढण्यात व त्यांचे अधिकचे मनोधैर्य वाढविण्यात जिल्हा पोलीस यंत्रणा देखील तितक्याच जबाबदार असू शकता असे ही भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
 याबाबत गृहराज्यमंत्री मा.ना.शंभूराजे देसाई यांचेकडे वेळोवेळी लेखी कळविले असून सामान्य जनतेवरती अन्याय करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत  गृहराज्यमंत्री कोणती भूमिका घेतायेत याकडे सामान्य जनांचे  लक्ष लागले आहे असेही पत्रकात भोसले यांनी सरतेशेवटी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments