सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: म्हसवड येथील मायणी चौकानजीक असलेल्या मेरीमाता हायस्कूल परिसरात असलेल्या वसाहती मधील सविता सुखदेव शिंदे यांच्या राहत्या बंगल्यात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यानी बंगला फोडला. बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यानी बंगल्यात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले 77 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा 3 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत. दरम्यान माण खटावचे उपविभाग पोलीस अधिकारी नीलेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे गतिमान केली.
या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी, मंगळवार दि 4 रोजी रात्री 8 वाजता पानवण, ता माण येथून सविता शिंदे यांना फोन आला. सासूबाई फार आजारी आहेत लवकर या असे सांगितल्याने सौ. शिंदे त्यांचे पती व मुलगा असे तिघे पानवण येथे सासूबाईना भेटण्याकरीता घराला कुलुप लावून पानवण येथे गेले. मात्र, सासूबाई जास्त सिरीयस असल्याने तेथेच सर्वजण थांबले.
रात्री एकच्या शिंदे यांच्या सासूबाईचे निधन झाल्यामुळे त्यांना तेथेच मुक्काम करावा लागला बुधवारी सकाळी दि 5 रोजी सकाळी 7 वाजता शिंदे यांच्या शेजारी रहात असलेला जाधव यांनी फोन करुन सौ. शिंदे याना सांगितले की तुमच्या घराचे दार उघडे असून बहुतेक घरात चोरी झाली असल्याचे वाटत आहे तुम्ही ताबडतोब या.
सासूबाईचा अंत्यविधी आटोपून सौ शिंदे कुटुंब सकाळी 10 वाजता म्हसवड येथील आपल्या घरीपरतले असता त्यांना आपल्या घराचे दार सताड उघडे असल्याचे दिसून आले.
घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील प्लायवूडचे कपाट चोरट्यानी उचकटून सर्व कपडेे विसकटून फेकले होते. कपाटात ठेवलेले सोन्याच्या डब्यातील लाख 80 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 7 ग्रॅम वजनाचे 28 हजार रुपये किमतीचे काळ्या मण्यामधील गंठन असे एकूण 3लाख 8 हजार रुपये किमतीचे 7 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले असल्याची तक्रार सौ. सविता सुखदेव शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. दरम्यान, परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचा नेमका राऊंड कुठे असतो
दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून म्हसवड व परिसरात किरकोळ चोर्यांच्या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली असून म्हसवड येथील पीएसआय नागपूर येथे नोकरीला असलेल्या त्यांचे घरही चोरट्यांनी फोडले होते. माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या सह्याद्री गार्डन ढाब्यावर मधील तांब्याच्या धातूच्या भांड्यावर डल्ला मारला तर देवापूर परिसरातील दोन म्हशी नेल्याची तक्रार दाखल आहे. चोरट्यांनी यापुढे जाऊन चक्क गाढवाची चोरी केली होती. मात्र नागरीकांच्या सावधगिरी मुळे चोरटे गाढवांसह सापडले त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एका आठवड्यात चोरट्यांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे पोलिसांचा नाईट राऊंड नक्की कोठे आसतो असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे
0 Comments