Ticker

6/recent/ticker-posts

शनिवारी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस

फलटण: माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. दरम्यान दुपारी २ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत फलटण येथील आपल्या राजभवन बंगल्यावर शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती फलटण तालुका भारतीय जनता पार्टीने दिली आहे. 
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे दुपारी १ : ३० वाजता पुणे येथून फलटण मध्ये आगमन होणार आहे. फलटण येथील आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते ६ वाजेपपर्यंत विद्यानगर येथील राजभवनावर शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता उपळावे येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
दरम्यान फलटण मध्ये महारक्तदान शिबीर आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून रक्तदान शिबिराचे तसेच मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान तालुक्यातील मुंजवडी येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप,आश्रमशाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप,आदी विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments