75 टक्के काँग्रेस फोडणं सोप्प नाही, जयकुमार गोरेंना काँग्रेसचे प्रत्युत्तर - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, March 28, 2022

75 टक्के काँग्रेस फोडणं सोप्प नाही, जयकुमार गोरेंना काँग्रेसचे प्रत्युत्तर

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
  75 टक्के काँग्रेस 15 दिवसांत फोडणं एवढं सोप्प नाही, अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या 15 दिवसांत 75 टक्के काँग्रेस भाजपामध्ये असेल या विधानाला सातारा युवक काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सूर्यवंशी प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात सूर्यवंशी यांनी म्हटलेे आहे की, आम्हाला मान्य आहे काँग्रेसची जिल्ह्यात परिस्थिती पूर्वी सारखी नक्कीच नाही. पण जे सत्तेसाठीच काँग्रेस मध्ये होते. ते सत्ते बरोबर सत्ता जाताच निघून गेले. त्या पंक्तीतच आपण आहात आणि आत्ता जी काही उरली सुरली काँग्रेस आहे ती काँग्रेसच्या विचारधारेवर प्रेम करणारी काँग्रेसचा विचार प्रमाण मानून जगणारी काँग्रेस शिल्लक आहे. आणि ज्यांची विचारांची बैठक मजबूत असते त्यांना संघर्षाची भीती नसतेच.
 तुम्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत किती होता हा संशोधनाचा मुद्दा आहे.  होता तो फक्त आनंदराव नाना आणि तुमचा अंतर्गत वाद. त्याला पक्षीय सोयर - सुतक काही नव्हते. हे दोघांनीही काँग्रेस सोडून सिद्ध केलं आहे. जिल्हाध्यक्षपदा बाबत काँग्रेस कडून अन्याय झाला असं तुम्हाला वाटत असेल तर काँग्रेसने ही आपणांस भरभरून दिले आहे. विशेषतः पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना तर भाऊ तुम्ही होल अन सोल होता. भाऊ तो तुमचा रुबाब आजही आठवतो. बाबांनी तुम्हाला ताकद देताना प्रसंगी मित्र पक्षाचा वाईटपणा घेतला. पण जयाभाऊंच्या बाबतीत कधी पृथ्वीराज बाबानी कुठल्या गोष्टीत हात आखडता घेतला नाही. महाराष्ट्राचा एक युवा आमदार म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रोजेक्ट केलं. मग राहुल गांधींचा दौरा असो वा विकास कामे. पण, ज्या वेळी जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा तुम्हीच ऐन वेळी रणजितसिंहांचे नाव सुचवले. अन रणजितसिंह जिल्हाध्यक्ष झाले. अन जिल्हाध्यक्ष झाल्याव एक महिनाभरात भाजपवासी झाले. अन पाठोपाठ तुम्ही त्यांच्या मागोमाग गेला. वास्तविक हे तुमचं ठरवून प्रि-प्लॅन होतं की काय.? अशी सुद्धा 2019 ला त्यावेळी जिल्हाभर चर्चा ऐकाय मिळत होती.
बरं असो झालाय ना जिल्हाध्यक्ष तुम्हाला शुभेच्छा...!
फक्त 15 दिवसांत काँग्रेस फोडून दाखवतो. अशी विधाने करू नका. कारण तुम्ही काँग्रेसमध्ये असताना बाबांना गुरू मानत होता. अन कुठलाच गुरू आपल्या शिष्याला सगळी विद्या देत नाही तर काही डावपेच राखून ठेवतो. एवढं सोप्प नाही काँग्रेस संपविणे. काँग्रेस संपविण्यासाठी नरेंद्र मोदी अन अमित शाह यांनी जंग जंग पछाडले पण काँग्रेस मुक्त भारत झाला नाही. तेव्हा सातारा जिल्हा काँग्रेस मुक्त होणं हे तुमचं दिवास्वप्न ठरेल. मान्य आहे आम्हाला आमची सध्या परिस्थिती हलाखीची आहे. पण आम्ही काँग्रेसवाले विश्‍वास हरवून न बसता पुन्हा नव्याने कामाला लागलोय.. पण ही काँग्रेस आहे. मुळा तुन जाऊच शकत नाही. सत्तेचा जोर कायम एकसारखाच नसतो...
त्याला हि चढउतार असतात. पण तुमच्या आक्रमक स्वभावाला 100% भविष्यात भाजप मधूनच पोकळ घिस्सा होणार नाही कशावरून.?  जिल्ह्यात सध्या जो पक्ष प्रबळ आहे. त्यांच्या न तुमच्यातून विस्तव जात नाही. असं असताना थेट तिसर्‍या नंबरच्या काँग्रेसवरच जिल्हाध्यक्ष झाल्यावर पहिला हल्ला करण्याचे कारण काय.? बर असो काय टीका करायची तो तुमचा वैयक्तिक प्रश्‍न आहे.  बाकी आम्ही काँग्रेसजन भाजप शी लढण्यास आक्रमक आहोत. कारण काँग्रेसचा जन्मच संघर्षातून झालेला आहे. अन् ही काँग्रेस पुन्हा आम्ही आमच्या विचारांच्या अन संघर्षाच्या ताकदीवर उभा करणारचं...!!  लवकरच सातारा जिल्ह्यात करारा जवाब बघाय मिळेल. जनतेचा विश्‍वास आहे. कुर्बानी चा इतिहास आहे. म्हणूनच सामान्य कार्यकर्त्यांच्या रूपाने काँग्रेस आजही टिकून आहे अन पुढे जाऊन पुन्हा गत वैभव प्राप्त करेल, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment