शेंद्रे
: सातारा जिल्हातील महावितरणकडे काम करीत असलेल्या विद्युत ठेकेदारांनी
त्यांच्या विविध मागण्यासाठी १ एप्रिल पासुन बेमुदत काम बंद आदोलनाचा इशारा
देण्यात आला आहे यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये प्रलंबित बिले तात्काळ
वितरीत करण्यात यावी ,दर सुचीमध्ये वाढ करून ती बाजारभावाशी जुळती म्हणजे
३०ते ५० टक्क्यांनी वाढ करावी , प्राईज व्हेरिएशनचा नियम सर्व ठेकदारांना
लागु करण्यात यावा या मागण्याचे निवेदन असोशिएशनच्या वतीने अधिक्षक अभियंता
गायकवाड साहेब यांना नुकतेच देण्यात आले यावेळी राज्याचे उपाध्यक्ष
बाळासाहेब कदम, विभाग अध्यक्ष साहेबराव पवार , जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव
साळुंखे , चंद्रकांत चव्हाण , अनिल बामणे , पांडुरंग पवार , नानासो काळोखे ,
अमोल पवार , सचिन रणदिवे , मिलिन घाडगे , प्रविण कोल्हे , हनुमंत घाडगे ,
दिपक कदम , नवनाथ वालेकर , तुषार शिंदे , युवराज दबडे, आरपी मोरे , इतर
सर्व ठेकेदार उपस्थित होते

0 Comments