सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
चितळी : सोसायटी निवडणूक लढलेल्या सिद्धनाथ पॅनेलचा व डॉ येळगावकर यांचा कोणताही आर्याअर्थी संबंध नव्हता त्यांनी स्थापन केलेल्या यशोदीप ची निवडणून बिनविरोध झाली आहे. आम्ही त्यांना विनंती करून आन्यायाविरुदध आम्हाला साथ द्यावी, असे सांगितले होते तरी देखील आपण त्यांच्यावर चिखलफेक केली हे तुमच्या स्वभावाला धरून आहे, अशी टीका करत यापुढील काळात आम्ही अन्यायाविरुद्ध लढणार्या डॉ येळगांवकराना साथ करून आपली हुकूमशाही मोडत काडणार आहे, असे आव्हान सोमनाथ माळी यांनी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंना दिले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मायणी येथील यशवंत वि. का. सेवा सोसायटीची 1948-49 मध्ये कै. जगन्नाथराव जाधव, कै. बी. टी. पुस्तके, कै. उत्तमराव चोथे, कै. पांडूरंग माने, कै. मारुती भिसे इ. लोकानी स्थापन केली होती. इतकी जूनी सोसायटी असून सुद्धा आपण आयत्या बिळावर शिरलेले नागोबा, मालकीची इमारत उभी करू शकला नाही. एक हजार मयत सभासदांची वारसनोंद केली नाही या सर्व वारसांना जिल्हा बँकेच्या योजनातून व शासकीय कर्जमाफीतून वंचित ठेवले हे पाप तुम्ही आजपर्यंत केले. मयत एक हजार सभासदांची नोंद झाली असती तर तर तुम्हाला ही सोसायटी ताब्यात ठेवता आली नसती ही भीती असल्याने तुमचा एकतर्फी कारभार चालला.
निवडणुकीत 1851 पैकी 861 मजदान झाले यावरून मृत्य पावलेल्या सभासदांच्या वारसांची नोंद केली नाही हे जगजाहीर आहे. सिद्धनाथ परिवर्तन पॅनेल मध्ये उभे राहिलेले सर्व उमेदवार यांच्या घराण्याने दोन पिढया कै. भाउसाहेब गुदगे यांची नि:स्सीम सेवा केली होती.
त्यांनी आम्हाला अथवा आमच्या वडीलधा-यांना कधीही दुजाभाव केला नव्हता. मात्र गेल्या 15-20 वर्षात कै. भाउसाहेबांना डावलून आपण गावावर हुकूमशाही लादली व मनमानी कारभार केला याला कंटाळून आम्ही कै. भाउसाहेब गुदगे यांचे कटटर कार्यकर्ते आपणापासून बाजूला होऊन स्वतंत्र पॅनेल उभे केले व तुमची दमछाक केली तुम्हाला घरोघरी जावून पाया पडून व घर गार्हाने गाऊन मतदान मिळवावे लागले, अशी टीकाही माळी यांनी केली आहे.
0 Comments