Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडी-गोंदवले रोड झुडूपांपासून झाला मोकळा

सत्य सह्याद्री इफेक्ट 

 सत्य सयाद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :
दहिवडी ते गोंदवले रोडची दुर्दशा झाली होती. या ठिकाणी सुप्रसिद्ध असलेल्या ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. त्यातच दहिवडी गोंदवले रोड लगत असलेल्या घाणेरी आणि काटेरी झुडुपांनी विळखा घातल्याने रस्ता खराब झाला होता. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत होता , रस्ता दुरुस्ती करण्याची आणि काटेरी झुडुपांची वाट लावण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती , याची दैनिक सत्य सयाद्रीने बातमी प्रसिद्ध केल्यावर बांधकाम विभागाचे डोळे उघडले आहेत.

 काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे वाढल्याने पुढून आलेले वाहन वाहनधारकांना दिसत नाही परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. चार -पाच वेळा किरकोळ अपघातही घडले होते. हे काम लवकर मार्गी लागले नाही तर जनसामान्य लोकांना साथीला घेत आंदोलनाचा पवित्रा वाहन चालकांनी स्वीकारला होता. या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी ही ये- जा करत असतात. परीक्षेच्या कालावधीत जर एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झालाच तर या गोष्टीची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार का? असा सवाल जनतेतून उमटत होता. हा आवाज बांधकाम विभागापर्यंत पोहचवण्याचे काम दै. सत्य सयाद्रीने केले होते. याची दखल घेत बांधकाम विभाग कामाला लागले आणि रस्त्यावर येणारी ,प्रवासास अडथळा करणारी झाडे झुडुपे बांधकाम विभागाने काढली आहेत, यामुळे घाणेरी आणि काटेरी झुडुपांच्या विळख्यात सापडलेल्या दहिवडी गोंदवले रोडने मोकळा श्वास घेतला आहे.
  या रोडप्रमाणेच तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजत नाही तर अनेक ठिकाणी अशाच काटेरी झाडे-झुडुपांनी रस्ता रोखुन धरला आहे,परिणामी नागरिक आणि वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून या झाडांमुळे पुढून येणारे वाहन दिसत नाही,त्यामुळे मोठमोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे, ही बाब लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्ता स्वच्छता मोहीम तालुकाभर राबवली पाहिजे.

Post a Comment

0 Comments