जांभळेवाडी (पुनर्वसन, ता. सातारा) : वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले झाड.
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शेंद्रे : येथून नजीक असलेल्या जांभळेवाडी (पुनर्वसन, ता. सातारा) येथे आज सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले.
नागठाणे- सोनापूर रस्त्यावर जांभळेवाडी (पुनर्वसन) हे गाव आहे. आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा जांभळेवाडीस बसला. त्यात जोराच्या
वाऱ्यामुळे गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या परिसरात असलेले
विजेचे खांब पडले.विजेच्या तारा तुटल्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला. घरालगत असलेली झाडेही काही ठिकाणी उन्मळून पडली. मनोहर भातुसे यांच्या घरालगत असलेले मोठे झाड वादळामुळे जमीनदोस्त झाले. भरत अरगडे यांच्या घरावरही नारळाचे झाड कोसळले. गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगल्यामुळे
अनर्थ टळला
No comments:
Post a Comment