Hot Posts

6/recent/ticker-posts

पाय घसरून नदीत पडल्याने महिलेचा मृत्यू

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मेढा:
शेताकडे जात असताना पाय घसरून वेण्णा नदीपात्रात पडून म्हाते खुर्द, ता. जावली येथील महिलेचा दुर्दैवी अंत झाला. रक्षाबंधनादिवशीच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. जनाबाई काशिनाथ दळवी, असे मृत महिलेचे नाव आहे.
त्या शेताकडे जात असताना पाय घसरून वेण्णा नदीत पडल्यानंतर गुरुवारी दिवसभर पाऊस असलेने सकाळपासून शोधकार्यात अडचणी येत होत्या. म्हाते खुर्दपासुन त्या वाहत वाहत करंजे गावातील ओढ्याला कातकरी समाजाने लावलेल्या जाळीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला  .
 याबाबतचे वृत्त समजताच मेढा येथे असलेले वृक्षारोपणाचे कार्यक्रम अर्धवट सोडून तहसीलदार राजेंद्र पोळ घटनास्थळी दाखल झाले. मेढा पोलीस स्टेशनचे  सहायक निरीक्षक अमोल माने,  धीरज बेसके, नंदकुमार कचरे, काळे साहेब उपस्थित होते. दुपारी चारच्या दरम्यान त्यांचे पोस्टमार्टम करणेत आले. वागदरे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष काशिनाथ दळवी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे चार विवाहीत मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तपास हवालदार धीरज बेसके करीत आहेत.

Post a Comment

0 Comments