सव्वा दोन लाखांवर डल्ला मारून ओपन चलेंज
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: चोऱ्यांचा धडाका लावून सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांची झोप उडवणाऱ्या चोरट्यांनी ढेकळे यांना जाता जाता चांगलाच दणका दिला. दहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी सव्वा दोन लाखांवर डल्ला मारून चोरट्यांनी पोलिसांना ओपन चॅलेंज दिले आहे. विशेष म्हणजे सिसी टीवी फुटेज मध्ये चेहरा दिसूनही माहिती दिल्यास चोरटे सावध होतील असा जावईशोध लावणाऱ्या म्हसवड पोलीस ठाण्यातील अतीशहाण्याना नवे कारभारी बुद्धी देणार का आणि आतातरी चोरटे पकडुन म्हसवड करामध्ये निर्माण झालेली भीती दूर करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. चोरट्यांचे हे चॅलेंज राजकुमार भुजबळ स्वीकारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर चौक परिसरात असलेल्या सागर मेडिकल व होलसेल विक्रेते यांचे मेडिकल दुकानाचा दरवाजाची कडी व कोंडा व कुलूप लोखंडी हत्याराने कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकान उघडून दुकानाच्या ड्राव्हर मध्ये ठेवलेलं सलग तिन दिवस बँकेला सुट्टी असल्याने मेडिकल मध्ये ठेवलेली दोन लाख, सोळा हजार दोनशे सत्तर रोख रक्कम व एक दोन हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, दुसरा जिवो कंपनीचा दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण दोन लाख वीस हजार दोनशे सत्तर रुपयेची चोरी झाली आसुन या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आसुन या सव्वा दोन लाखाच्या मेडिकल फोडीतील चोरटा सी सी टीव्ही मध्ये कैद झाला असताना हि या चोरीतील चोरट्याला पकडण्यात मात्र म्हसवड पोलिसांना अद्याप यश आलेले नाही या चोरीचा तपास पीएस आय विशाल भंडारे करत आहे. ही घटना 10 ऑगस्टला घडली आहे.
0 Comments