पिंपोडे
बु ॥ ( प्रतितिधी )
वाठार स्टेशन येथील टी व्ही एस शोरूम मधून ऑनलाईन
पैसे जमा केल्याचा खोटा मेसेज दाखवून शोरूमची फसवणूक करून गाडी घेणाऱ्या
ठकास वाठार स्टेशन पोलिसांनी अटक केली असून टी व्ही एस शोरूम मध्ये दिनांक
14 /०8 /22, रोजी जुपिटर गाडी घेण्यासाठी आलेल्या एका इसमाने त्याचे बँक
खात्यावर 21 लाख रुपये असल्याचा मेसेज शोरूम मधील मॅनेजर यांना दाखवून
ज्युपिटर गाडी खरेदी केली गाडी खरेदी केल्यानंतर शोरूम च्या नावाने गाडीची
किंमत रुपये 93 हजार जमा केलेचा व त्याचे खात्यातून 93 हजार रुपये
ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवून गाडी घेऊन गेला त्यानंतर शोरूमचे
मॅनेजर व स्टाफ यांनी त्यांचे बँक खात्यावर चेक केले असता पैसे जमा झाले
नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर
त्यांनी वाठार स्टेशन पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा रजिस्टर नंबर 208/ 2022
भा द वि कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल
झाल्यानंतर लगेच वाठार पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक संजय बोंबले
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर व महिला पोलीस
हवालदार दिपाली गुरव पोलीस शिपाई गणेश इथापे यांनी सदर गुन्हयाचा तपास करून
आरोपी अनिल बापूराव धवडे वय ४२ रा शिर्सुफळ ता बारामती जि पुणे सध्या रा
खेड आदर्श नगर, सातारा येथून जुपिटर गाडीसह ताब्यात घेऊन वाठार पोलीस
स्टेशनला आणून गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास
महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव या करीत आहेत
सदर आरोपीने त्याच्या खात्यावर लाखो रुपये असल्याचा खोटा मेसेज दाखवून
बँकेचे सुट्टी दिवशी वेगवेगळ्या प्रकारची सर्वत्र खरेदी करून व्यवहार करीत
होता व्यवहार झाल्यानंतर हातचलाकी करून खरेदी केलेल्या वस्तूची किंमत
ट्रान्सफर केले चा खोटा मेसेज दुकानदारांना दाखवून त्यांची फसवणूक करीत
होता त्याने गाड्यांची शोरूम, किराणा माल दुकानदार, तसेच इतर अशा अनेक
दुकानदारांची फसवणूक केलेली तपासात आढळून आले
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले असून सर्व छोटे-मोठे दुकानदार व
व्यवसायिकांनी ऑनलाईन खरेदीचे पैसे घेताना आपले बँक खात्यात पैसे जमा
झाल्याची खात्री झाल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये तसेच ऑनलाईन व्यवहार
करताना दक्षता घ्यावी असे अवाहन वाठार स्टेशन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

0 Comments